शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

ऐन दिवाळीतही भारनियमनाचा शॉक

By admin | Updated: October 26, 2014 22:41 IST

सर्वात मोठा सण म्हणून साजरा करण्यात येत असलेल्या दिवाळीच्या सणातही महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने आपल्या निष्ठुरतेची हद पार केली. ऐन दिवाळीच्या दिवशीही वीज पुरवठा खंडीत

गोंदिया : सर्वात मोठा सण म्हणून साजरा करण्यात येत असलेल्या दिवाळीच्या सणातही महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने आपल्या निष्ठुरतेची हद पार केली. ऐन दिवाळीच्या दिवशीही वीज पुरवठा खंडीत करण्यात आल्याचा प्रकार घडला. शिवाय हा दररोजचाच प्रकार बनल्याने महावितरणच्या या कृत्यामुळे मात्र नागरिकांत चांगलाच रोष दिसून येत आहे. राज्यात सर्वाधीक वीज उत्पादन करणारा प्रकल्प जिल्ह्यात उभा असूनही बाहेरचे सुखात असून घरची मंडळीच उपाशी मरत असल्यागत स्थिती जिल्हावासीयांची झाली आहे. अन्य दिवसांत तर ठिक आहे मात्र सणासुदीत तरी भारनियमनाचा फटका पडू नये अशी अपेक्षा नागरिकांची आहे. मात्र महावितरणला लोकांकडून फक्त पैसे घेणे असून त्यामोबदल्यात मात्र काहीच देणे नसल्याचे स्पष्ट चित्र आहे. यामुळेच सणासुदीलाही लक्ष न देता महावितरणकडून भारनियमन जाणून केलेच जात असल्याचा अनूभव हमखास येतो. हाच प्रकार ऐन दिवाळीच्या दिवशीच काय दिवाळीच्या पाचही दिवसांत अनूभवायला मिळाला. दिवाळीच्या दिवशी दिवसा भारनियमन करण्यात आले होते. तर त्या नंतरही दररोजचे भारनियमन सुरूच आहे. विशेष म्हणजे वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांची कामे अडतात. तर शहराची बाजारपेठ जिल्ह्यासह लगतच्या राज्यांपर्यंत प्रसिद्ध असल्याने तेथील नागरिक खरेदीसाठी गोंदियाच्या बाजारपेठेत येतात. अशात वीज पुरवठा खंडीत झाल्यास त्यांच्या व्यापारावर परिणाम तर पडतो. शिवाय घरगुती क ामे अडून पडतात. अन्य दिवसांची तर शहरच काय जिल्हावासीयांनी सवय बनवून घेतली आहे. मात्र दिवाळी सारख्या सणांत महावितरण नागरिकांना देत असलेला शॉक असहनीय होत असल्याच्या प्रतिक्रीया नागरिकांतून उमटत आहेत. वीज चोरीची टक्केवारी सांगत महावितरण भारनियमन करीत असल्याचे सांगते. मात्र वीज चोरांना सोडून सामान्य नागरिकांना याचा फटका सहन करावा लागत असल्याने नागरिकांत अधिकच रोष दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)