शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

आम्ही प्रफुल्ल पटेलांसोबत! गोंदिया जिल्ह्यातील दीड हजार सदस्य स्टॅम्प पेपरवर देणार लिहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2023 22:35 IST

Gondia News गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दीड हजारांवर सक्रिय सदस्य शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आम्ही अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांच्यासह असल्याचे शपथपत्र शुक्रवारी (दि.७) लिहून देणार आहेत.

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आता दाेन गट निर्माण झाले आहे. एक गट खा. शरद पवार यांचे समर्थन करणारा तर दुसरा गट ना. अजित पवार यांना समर्थन करणारा आहे. खा. प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांच्यासोबत असल्याने गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यसुद्धा त्यांच्यासोबत आहेत. हेच आता जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दीड हजारांवर सक्रिय सदस्य शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आम्ही अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांच्यासह असल्याचे शपथपत्र शुक्रवारी (दि.७) लिहून देणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी २ जुलैला राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत नऊ जणांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह खा. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्यासारखे दिग्गज नेते व आमदारांनीसुद्धा त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देत त्यांच्यासह गेले. दरम्यान, या सर्व प्रकारावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. दरम्यान, पक्षात वर्चस्व कोणाचे व कोणाच्या बाजूने किती नेते, कार्यकर्ते आहेत हे दाखविण्यासाठी खा. शरद पवार आणि ना. अजित पवार यांच्यात आता ‘किस मे कितना है दम’चा संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. मात्र, गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य, कार्यकर्ते एकसंघपणे खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे आहेत. जिल्ह्यातून अद्यापही एकही पदाधिकारी व सदस्यांने आपले समर्थन खा. शरद पवार यांना असल्याचे जाहीरपणे पुढे येऊन सांगितले नाही. एवढेच तर आता जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दीड हजारांवर सक्रिय सदस्य शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आम्ही अजित पवार आणि खा. प्रफुल्ल पटेल यांच्यासह असल्याचे शपथपत्र लिहून देणार आहेत.

प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक 

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्व शहरध्यक्ष, तालुकाध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी, प्रमुख नेते मुंबईहून गुरुवारी गोंदियाला परतले. त्यानंतर आता शुक्रवारी (दि.७) या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची सकाळी ११ वाजता रेलटोली येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक बोलविली आहे. या बैठकीत हे शपथपत्र भरून घेण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांनी सांगितले.

आता मोर्चेबांधणीवर भर

जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, नेत्यांनी आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शुक्रवारपासून या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आहे.

आमचा निर्णय पक्का, प्रफुल्ल पटेलांनाच शिक्का

जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रमुख नेत्यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प केला आहे. आमचा निर्णय पक्का झाला असून आपला प्रफुल्ल पटेलानांच शिक्का असल्याचे सांगितले.

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेल