शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

लाल विटांचा व्यापार नष्ट होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: June 1, 2016 02:19 IST

अवकाळी पाऊस व प्लांटचा कचरा-राख यापासून तयार होणाऱ्या विटांमुळे मातीच्या लाल विटांचा व्यापार नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

जिल्हा वीट निर्माता संघ : मजुरांवर बेरोजगार होण्याची पाळीगोंदिया : अवकाळी पाऊस व प्लांटचा कचरा-राख यापासून तयार होणाऱ्या विटांमुळे मातीच्या लाल विटांचा व्यापार नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे लाल विटा तयार करणारे मजूर व कंत्राटदार अडचणीत आले आहेत.विटांचा व्यापार जुगारासारखा असतो. वीटभट्टी मालकांना मोठा पैसा कमावणारा वर्ग समजला जातो. परंतु आता त्यांची स्थिती विदर्भातील शेतकऱ्यांसारखी झाल्याचे जिल्हा वीट निर्माता असोसिएशनचे म्हणणे आहे. अनेक वर्षांपासून शासन प्रताडित करीत आहे. उद्योगपतींचे पॉवर प्लाँट जिवंत ठेवण्यासाठी मातीच्या लाल विटा तयार करणाऱ्या मजूर, मालक व चालकांच्या उदरनिर्वाहाच्या साधनावरच लाथ मारली जात आहे. प्लाँटमधून निघालेला कचरा-राख आदिंपासून आता विटा बनविल्या जात आहेत. या विटांमध्ये नाममात्रच सिमेंटचा उपयोग केला जातो. त्यांची मजबुतीसुद्धा मातीच्या लाल विटांपेक्षा कमकुवत असते. तरी शासकीय बांधकामात त्या विटांचा उपयोग अनिवार्य करण्यात आला आहे. काही वर्गांना वाचविण्यासाठी खालच्या वर्गातील कोट्यवधी लोकांना बेरोजगार करण्याचे षडयंत्र सुरू आहेत, असा आरोप जिल्हा वीट निर्माता असोसिएशनने केला आहे.सरकार बदलली, मात्र भट्टी मालक व मजुरांची परिस्थिती बदलली नाही. लाखो लोकांना रोजगार देणारा व्यापारास आज शासनाच्या वतीने लघू उद्योग समजले जात नाही. कोणतीही बँक कर्ज देत नाही. सतत नुकसान झाल्यावरही कोणतीही शासकीय मदत मिळत नाही. नुकसानीचे सर्व्हेक्षण करतानाही दुर्लक्षच केले जाते. यात मशीनचा उपयोग होत नसल्यामुळे या उद्योगाला उद्योगच समजले जात नाही. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वीट भट्ट्या होत्या, त्यांचे प्रमाण आता कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.यावर्षी सततच्या अवकाळी पावसामुळे भट्टी मालकांवर वाईट परिस्थिती ओढवली आहे. अनेक भट्ट्या आधीच बंद पडल्या आहेत. उत्पादनही जवळपास ५० टक्केच झाले आहे. ताज्या विटा तर आज कोणत्याही भट्टी मालकाजवळ नाहीत. यावर्षी विटांचे दरसुद्धा खूप कमी होते. बांधकाम कमी आहे. परंतु लवकरच विटांचे दर वाढतील, अशी माहिती जिल्हा वीट निर्माता संघाचे अध्यक्ष मुस्तफा सिद्धिकी यांनी दिली आहे. तसेच सद्यस्थितीत विटांचे दर ३ हजार २०० रूपये ट्राली आहे. जर आम्ही ४ हजार ५०० रूपये ट्रालीप्रमाणे विक्री केले तरी नुकसानीची भरपाई शक्य होणार नाही, असे संघाचे उपाध्यक्ष महेश लालवानी व कोषाध्यक्ष दिगंबर लिचडे यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)