शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांनी केले जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 06:00 IST

धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर शासकीय जलपूजनाची प्रथा असल्याने मंगळवारी (दि.३) सकाळी १० वाजता तहसीलदार मेश्राम यांनी जलपूजन केले. तालुक्यातील शेतकरी सुखी व समृद्ध व्हावा अशी जलदेवतेला मनोकामना केली. ओव्हरफ्लोमुळे पूर संभावित गावातील जनतेने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले.

ठळक मुद्देइटियाडोह धरण ओव्हरफ्लो : पर्यटकांना पर्वणी, शेतकऱ्यांत आनंद

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : सर्वदूर प्रसिद्ध असलेले इटियाडोह धरण तब्बल सहा वर्षांनंतर मंगळवारी (दि.३) सकाळी ४ वाजता ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या सांडव्यावरून दोन इंच पाणी वाहत असल्याचे विहंगम दृश्य डोळ््यांचे पारणे फेडण्यासारखेच आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर शासकीय जलपूजन करण्याची येथे प्रथा आहे. त्यानुसार, तहसीलदार विनोद मेश्राम यांनी सकाळी १० वाजता शासकीय जलपूजन केले.धरण ओव्हर फ्लो होण्याची पर्यटकांसह सर्वांनाच प्रतीक्षा असते. यावर्षी झालेल्या दमदार पर्जन्यवृष्टीमुळे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यापूर्वी सन २०१३ मध्ये धरणे ओव्हरफ्लो झाले होता. गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हरितक्र ांतीचे स्वप्न साकार करणारे इटियाडोह धरण केव्हा ओव्हरफ्लो होते याची शेतकºयांना आस असते. या धरणाच्या पाण्यामुळे शेतीला सिंचन होत असते. धरणात अधिकचा पाणीसाठा झाल्यानंतर दुबार धानपीक घेतले जाते. त्यामुळे शेतकरी वर्गातही आनंद व्यक्त केला जात आहे.दरम्यान, धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर शासकीय जलपूजनाची प्रथा असल्याने मंगळवारी (दि.३) सकाळी १० वाजता तहसीलदार मेश्राम यांनी जलपूजन केले. तालुक्यातील शेतकरी सुखी व समृद्ध व्हावा अशी जलदेवतेला मनोकामना केली. ओव्हरफ्लोमुळे पूर संभावित गावातील जनतेने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले. यावेळी इटियाडोह पाटबंधारे विभागाचे उप विभागीय अभियंता दिपक भिवगडे, शाखा अभियंता हितेश लंजे, कालवा निरीक्षक एम. आर. ढोक, तलाठी पुंडलीक कुंभरे, विनोद राऊत, पतीराम राणे उपस्थित होते.गावांना सर्तकतेचा इशाराधरणातील पाण्याच्या विसर्गामुळे गाढवी नदी फुगते. त्यामुळे नदीकाठावरील गावांना पुराचा धोका संभवतो. पुष्पनगर (अ) व (ब), वडेगावबंध्या, बोरी, चिचोली, करांडली, खोकरी, दिनकरनगर, सावरी, खोळदा, जरु घाटा, सुरबन या गावांना अधिक भीती असते. प्रशासनाने तशा सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. ओव्हरफ्लो होताच पर्यटकांनी गर्दी केली होती. उत्सुकतेपोटी पर्यटक पाण्यात उतरतात अशावेळी दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

टॅग्स :Itiadoh Projectइटियाडोह प्रकल्पTahasildarतहसीलदार