शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात पाइपलाइन लिकेजमुळे ४८ गावांचा पाणीपुरवठा ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 14:33 IST

भर उन्हाळ्यात कसे होणार : देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंपनीचे देयक थकले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमगाव-सालेकसा तालुक्यातील ४८ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा पाणी पुरवठा शनिवारपासून (दि.२२) पाइपलाइन लिकेज झाल्याने ठप्प झाला आहे. त्यामुळे या ४८ गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणावरील रुंगाटोला येथे उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत आमगाव व सालेकसा तालुक्यातील ४८ गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र कधी वीज पुरवठा खंडित तर कधी पाइपलाइन लिकेज झाल्याच्या कारणावरून अनेकदा पाणी पुरवठा ठप्प असतो. त्यामुळे या योजनेअंतर्गत पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन दोन ठिकाणी लिकेज झाली आहे. हे लिकेज मोठे असल्याने शनिवारपासून या योजनेचा पाणी पुरवठा ठप्प करण्यात आला आहे. पाइपलाइन लिकेज दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. या योजनेवर अवलंबून असणाऱ्या पाण्यासाठी भटकंती करावी लागेल.

आमगाव येथील जुन्या योजनेमुळे होतेय मदतआमगाव शहरात जुनी पाणी पुरवठा योजना अद्यापही कार्यरत आहे. या योजनेअंतर्गत काही भागाला पाणी पुरवठा करण्यात येतो. बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद असल्याने आमगाव शहरवासीयांना जुन्या योजनेची मोठी मदत होत आहे. 

उन्हाळ्यात कसे होणार ?बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कधी थकीत वीज बिलामुळे तर कधी पाइपलाइन लिकेजमुळे ठप्प होतो. ही आता नेहमीचीच समस्या झाली आहे. तर योजनेची पाइपलाइनसुद्धा जीर्ण झाली असून ती दुरुस्तीकडे जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात काय होणार अशी चिंता आतापासूनच या योजनेवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना सतावत आहे.

देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंपनीचे देयक थकले

  • बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी जि. प. अंतर्गत एका खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • या कंपनीने देखभाल दुरुस्तीचे देयके गेल्या अनेक महिन्यांपासून थकले असल्याने या कंपनीने देखभाल दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याची माहिती आहे.
  • मात्र याचा फटका बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या ४८ गावांतील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

"पुजारीटोला धरणावरून रुंगाटोला येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनला दोन ठिकाणी लिकेज झाले आहे. हे लिकेज मोठे असल्याने ते दुरुस्तीचे काम सध्या युद्धापातळीवर सुरू असून योजनेचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. काम पूर्ण होताच पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल."- राजेंद्र सतदेवे, उपविभागीय उपअभियंता, जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग.

टॅग्स :gondiya-acगोंदियाwater transportजलवाहतूक