शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानक,क्वॉर्टरवर पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 22:16 IST

शहरातील मुख्य रेल्वे स्थानक व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या क्वॉर्टरला गोंदियापासून १५ कि.मी.अंतरावर असलेल्या बिरसोला येथील बाघ नदीच्या पात्रात उभारलेल्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र बाघ नदीच्या पात्रात केवळ ४ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने रेल्वे स्थानकावरील प्रवासी आणि क्वॉर्टरमधील कर्मचाऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देबाघ नदीत ४ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा। प्रवाशांना बसू शकते झळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील मुख्य रेल्वे स्थानक व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या क्वॉर्टरला गोंदियापासून १५ कि.मी.अंतरावर असलेल्या बिरसोला येथील बाघ नदीच्या पात्रात उभारलेल्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र बाघ नदीच्या पात्रात केवळ ४ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने रेल्वे स्थानकावरील प्रवासी आणि क्वॉर्टरमधील कर्मचाऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.जिल्ह्यात यावर्षी पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्याचे प्रशासनाचे नियोजन फसल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मात्र आता यातून गोंदिया रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचारी वसाहत सुध्दा सुटली नाही. हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एक महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक असून दररोज या रेल्वे स्थानकावरुन दीडशेहून अधिक रेल्वे गाड्या धावतात तर ४० हजार प्रवाशी ये-जा करतात. रेल्वे स्थानकावर रेल्वे विभागातर्फे प्रवाशांसाठी पाण्यासह इतर विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचाºयांच्या वसाहतीला गोंदियापासून १५ कि.मी.अंतरावर असलेल्या बिरसोला येथे बाघ नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. मात्र यंदा बाघ नदीचे पात्र लवकरच कोरडे पडले. परिणामी पाणी पुरवठा योजनेची विहिरी कोरडी पडली आहे. त्याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचाºयांच्या वसाहतीच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकाला पाणी पुरवठा करण्यासह विविध रेल्वे गाड्यांच्या कोचमध्ये सुध्दा पाणी पुरवठा केला जातो.मात्र आता बाघ नदीच्या पात्रात केवळ ४ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चार दिवसानंतरही रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचाºयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यात आले नाही तर रेल्वे प्रवाशांना सुध्दा पाणी मिळण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.पहिल्यांदाच पाणीटंचाईगोंदिया रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत पाणी टंचाईची स्थिती ही प्रथमच निर्माण झाल्याचे बोलल्या जाते. सध्या निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी रेल्वे विभागाने जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना व सिंचन विभागाला पत्र लिहून बाघ नदीत पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्याची मागणी केली आहे. मात्र अद्यापही यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.बाघ नदीचे पात्र पडले कोरडेगोंदिया रेल्वे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता के.मल्लिकार्जुन राव यांनी सांगितले की बिरसोला येथील बाघ नदीच्या पात्रातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र यंदा बाघ नदीचे पात्र लवकरच कोरडे पडले आहे. सध्या केवळ ४ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. पुजारीटोला धरणाचे पाणी सोडल्यास यावर मात करणे शक्य आहे.

टॅग्स :railwayरेल्वेwater shortageपाणीटंचाई