शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

शहरातील काही भागात पाणी टंचाई

By admin | Updated: May 3, 2016 02:13 IST

शहरातील सहकार नगर, साई कॉलनी, शहीद मिश्रा वॉर्ड, रेल्वे चौकी अशा विविध भागांत नळाचे पाणी पोहोचतच नाही.

तिरोडा : शहरातील सहकार नगर, साई कॉलनी, शहीद मिश्रा वॉर्ड, रेल्वे चौकी अशा विविध भागांत नळाचे पाणी पोहोचतच नाही. तर कित्येक भागांत अगदी अत्यल्प प्रमाणात पाणी मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. आता जेमतेम एप्रिल महिना सरला असून मुख्य मे महिना उरला आहे. मात्र शहरात आतापासूनच पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. शहरातील काही भागातील पाण्याची ही टंचाई आता वाढून अवघ्या शहराला गिळंकृत करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पाणी येत नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. विशेष म्हणजे काही धनाढ्यांसह मध्यमवर्गीयांनी बॉटल व कॅनचे पाणी पिण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे अशा पाण्याची मागणी वाढली आहे. कदाचित पाणी विके्रत्यांसोबत यांचे संगणमत नाही ना अशीही शंका निर्माण होत आहे. पाण्याची एवढी गंभीर समस्या असतानासुद्धा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नगर प्रशासन गप्प कसे काय हा विषय सध्या शहरात चर्चेचा ठरला आहे. शहरात पाणी पेटले असून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अद्याप कुणीही समोर आले नाही याचे मात्र शहरवासी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. त्यामुळे या गंभीर परिस्थितीकडे बघता जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित आदेश देऊन समस्या निकाली काढावी अशी मागणी शहरवासी करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी) ‘लोकमत’च्या बातमीचा घेतला आधार ४शहरातील पाणी समस्येबाबत आठ दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने बातमी प्रकाशित करून पाणी पुरवठा काळात लोडशेडींगची मागणी केली होती. त्याचा आधार घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता यांनी वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यांना पाणीपुरवठा काळात लोडशेडिंग करण्याबाबत पत्र दिले. तर त्याची प्रतिलिपी आमदार, नगर परिषद मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आली आहे.