शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वस्ताईचा गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स! जीएसटीचे ५% आणि १८% असे दोनच दर; विमा पॉलिसींना करसूट, सिमेंटवर १८% जीएसटी
2
GST Rate Cut: पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत?
3
श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
4
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 
5
GSTबाबत सरकारकडून भेट, दैनंदिन वापरातील वस्तू कुठल्या स्लॅबमध्ये आल्या? पाहा संपूर्ण यादी
6
जीएसटीमध्ये नेमके काय बदल झाले? काय किती स्वस्त झाले? जाणून घ्या एका क्लिकवर...!
7
40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी?
8
दसरा, दिवाळीत करा बंपर वस्तू खरेदी; जीएसटी लागणार कमी
9
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
10
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
11
'संगीत देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्तेचा घटस्फोट; पती पोस्ट करत म्हणाला, "काही वर्षांपूर्वीच..."
12
जीआर नव्हे, ही तर माहिती पुस्तिका, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका
13
शाब्बास..! मुंबई पोलिस, महापालिका, तुम्ही संयम शिकवला !
14
ओबीसींमध्ये जीआरवरून तीव्र संताप, जीआरविरोधात कोर्टात जायची तयारी
15
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हमधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
16
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
17
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
18
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
19
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
20
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक

शासनाच्या २५ कोटींच्या महसुलावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 05:00 IST

गोंदिया जिल्ह्यात २७ रेती घाट आहे. या २७ रेती घाटांच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला मागील वर्षी २५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. दरवर्षी मार्च महिन्यापूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण केली जात होती. रेती घाटांचे लिलाव करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळातंर्गत जनसुनावणी घेवून परवानगी तसेच राज्य स्तरीय पर्यावरण समितीची मंजुरी आवश्यक असते. मात्र यंदा मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण विभागातर्फे रेती घाटांच्या लिलावावर जनसुनावणी घेण्याची प्रक्रिया लांबणीवर गेली होती.

ठळक मुद्दे२४ रेती घाटांचे लिलाव रखडले : रेती माफीयांना सुगीचे दिवस

    लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  वर्षभराचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव करण्यात अद्यापही जिल्हा खनिकर्म विभागाला यश आले नाही. राज्यस्तरीय पर्यावरण समितीची रेती घाटांच्या लिलाव करण्यासाठी मंजुरी न मिळाल्याने महसूल विभागाला २५ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी फेरावे लागले. मात्र यामुळे रेतीमाफीयांना सुगीचे दिवस आले आहे. गोंदिया जिल्ह्यात २७ रेती घाट आहे. या २७ रेती घाटांच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला मागील वर्षी २५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. दरवर्षी मार्च महिन्यापूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण केली जात होती. रेती घाटांचे लिलाव करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळातंर्गत जनसुनावणी घेवून परवानगी तसेच राज्य स्तरीय पर्यावरण समितीची मंजुरी आवश्यक असते. मात्र यंदा मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण विभागातर्फे रेती घाटांच्या लिलावावर जनसुनावणी घेण्याची प्रक्रिया लांबणीवर गेली होती. त्यानंतर जनसुवाणीची प्रक्रिया तीन महिन्यापूर्वीच पूर्ण झाली. मात्र राज्यस्तरीय पर्यावरण समितीची मंजुरी न मिळाल्याने रेती घाटांचे लिलाव होवू शकले नाही. जिल्हा खनिकर्म विभागाने २७ पैकी २४ रेती घाटांचे लिलावाची प्रक्रिया पूृर्ण केली होती. मात्र मंजुरी अभावी ही प्रक्रिया पुढे जावू शकली नाही. परिमाणी रेती घाटांच्या लिलावाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या २५ कोटी रुपयांच्या महसुलावर जिल्हा प्रशासनाला पाणी फेरावे लागत आहे. 

पोखरेलेले रेती घाट घेणार कोण जिल्ह्यात रेती माफीयांचे प्रस्त मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यांनी जिल्ह्यातील एकही रेती घाट पोखरण्याची संधी सोडली नाही. याला काही प्रमाणात महसूल विभागाचे दुर्लक्षीत धोरण सुध्दा कारणीभूत ठरले आहे. लिलावापूर्वीच रेती घाट पूर्णपणे पोखरले असल्याने या रेती घाटांचे लिलाव झाले तरी हे घाट घेण्यास तयार कोण होणार असा प्रश्न कायम आहे. रॉयल्टी मध्यप्रदेशाची उपसा महाराष्ट्रातून गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेशाची सीमा लागून आहे. मध्यप्रदेशातील किन्ही येथील रेती घाट महाराष्ट्राला लागून आहे. त्यामुळे या भागातून रेती वाहून नेणाऱ्या ट्रकची वर्दळ सुरु असते. मध्यप्रदेशातील रॉयल्टीच्या नावावर महाराष्ट्रातील वैनगंगा नदीच्या घाटावरुन मोठ्या प्रमाणावर रेतीचा उपसा केला जात आहे. मात्र हा सर्व प्रकार महसूल विभाग डोळे मिटून पाहत आहे.

शासनाचा महसूल रेती माफीयांच्या घशात यंदा जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचे लिलाव झाले नाही. मात्र रेती घाट पोखरण्याचे काम थांबले नाही. लिलाव न झाल्याचा संधी फायदा जिल्ह्यातील रेती माफीयांनी घेतला. गरजू बांधकामधारक आणि घरकुल लाभार्थ्यांना अव्वाच्या सव्वा दराने रेतीची विक्री केली. यामुळे रेती माफीया चांगले गब्बर झाले. आजपर्यंत कधी नव्हे ती संधी लॉकडाऊनमुळे आणि रेती घाटांचे लिलाव झाल्यामुळे रेती माफीयांसाठी चालून आली. त्यांनी संधी पूरेपूर फायदा घेतला. त्यामुळे शासनाला रेती घाटांच्या लिलावातून प्राप्त होणार २५ कोटी रुपयांचा महसूल रेती माफीयांच्या घशात गेला म्हटल्यास वावगे होणार नाही. 

टॅग्स :sandवाळूmafiaमाफिया