शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

डांगोरलीत आज येणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 21:28 IST

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोरली येथे वैनगंगा नदीतील पाण्याचा साठा संपल्याने शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी यंदाही पुजारीटोला प्रकल्पातून पाणी घ्यावे लागले आहे.

ठळक मुद्देपुजारीटोलाचे पाणी शिरणार । शहरवासीयांसाठी पाण्याची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोरली येथे वैनगंगा नदीतील पाण्याचा साठा संपल्याने शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी यंदाही पुजारीटोला प्रकल्पातून पाणी घ्यावे लागले आहे. पुजारीटोला प्रकल्पातून गुरूवारी (दि.१८) दुपारी ३ वाजतादरम्यान पाणी सोडण्यात आले असून ते पाणी रविवारी (दि.२१) सायंकाळी डांगोरलीत पोहचणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.शहराला महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाकडून पाणी पुरवठा केला जातो. यासाठी डांगोरली येथे वैनगंगा नदीच्या पात्रात पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शहरवासीयांना प्रती व्यक्ती १८६ लीटर प्रमाणे दिवसातून दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो. मात्र मागील तीन-चार वर्षांपासून शहरवासीयांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यातच मागील वर्षापासून स्थिती अधिकच गंभीर झाली असून मागील वर्षी येथून ९० किमी अंतरावरील पुजारीटोला प्रकल्पातून कालव्यांच्या माध्यमातून पाणी आणावे लागले होते.यंदाही तीच स्थिती निर्माण झाली असून वैनगंगा नदीचे पात्र एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलच कोरडे पडले व त्यामुळे पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पातळी खालावली. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी यंदाही पुजारीटोला प्रकल्पाची धाव घ्यावी लागली आहे. त्यानुसार, गुरूवारी (दि.१८) पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले आहे. गुरूवारपासून पाण्याचा हा प्रवास डांगेरलीसाठी सुरू झाला असून शनिवारपर्यंत (दि.२०) पाणी ५० किमी पर्यंत पोहचले होते अशी माहिती होती.सोडण्यात आलेले पाणी कालव्यात जिरणार व त्यानंतर पुढे वाढत जाते. त्यामुळे रविवारी (दि.२१) सायंकाळी पाणी डांगोरलीत पोहचणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशात, रविवारी सायंकाळी पाणी पोहचण्याचा अंदाज असला तरी सोमवारी मात्र पाणी पोहचणारच असेही म्हणता येईल.विशेष म्हणजे, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच पाणी मागविण्याची पाळी आली आहे. यातून पाणी टंचाईची तिव्रता लक्षात घेते येते.१५० क्युसेस पाणी सोडलेशहराला पाणी करण्यासाठी सध्या पुजारीटोला प्रकल्पातून १५० क्युसेस पाणी सोडण्यात आल्याची माहिती आहे. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत लवकरच पाणी मागविण्याची पाळी आली आहे. यावरून जून महिन्यापर्यंत प्रकल्पातून आणखीही टप्प्यातून पाणी मागविले जाणार यात शंका नाही. यादृष्टीने प्रकल्पात पाणी साठी असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीटंचाई