लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कान्हा शर्मा (१७) या अल्पवयीन मुलाच्या खुनाने अवघ्या जिल्ह्यातच हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या निर्दयतेने कान्हाला ठार करण्यात आले यावरून अल्पवयीन मुले किती निष्ठूर झालेत याची प्रचिती येते. विशेष म्हणजे, कान्हाला ठार करण्यासाठी वापरण्यात आलेले चाकू पोलिसांनी जप्त केले असून आरोपींनी ते ऑनलाईन शॉपिंगद्वारे मागविले होते अशी माहिती आहे.कान्हा शर्माचा खून करणारी दोन्ही मुले मद्यप्राशन करून होती. त्यांनी त्याचा खून करण्याचा चंग आधीच बांधला होता. २३ ऑगस्ट रोजी दहीहंडीच्या कार्यक्रमात झालेल्या वादाचा राग म्हणून त्या दोघांनी कान्हा शर्मावर दोन चाकूने सपासप असे १८ घाव घालून त्याचा खून केला. खून करताना गळाही चिरडण्यात आला. खून करणाऱ्या बालकांपैकी एक विस्की तर दुसरा बियरच्या नशेत होता. अॅक्टीव्हाच्या डिक्कीत ते दोन्ही चाकू ठेवून कान्हाचा ते पाठलाग करीत होते. त्याला मनोहर चौकात गाठून भर चौकात त्याचा खून केला.अल्पवयीन बालकांमध्ये भर चौकात खून करण्याचे वाढलेले धाडस हे समाजात गुन्हेगारी कशी डोके वर उचलू पाहात आहे याचे हे मोठे उदाहरण आहे. सहजरित्या घातकशास्त्रही ऑनलाईनच्या माध्यमातून सहज मिळविता येतात हे या प्रकरणावरून लक्षात येते. गुन्हेगारीसाठी आता ऑनलाईनचा आधार घेतल्या जात आहे. खून केल्यानंतर पळून जाण्याच्या बेतात असताना ग्रामीण पोलीस ठाण्याजवळील रिंग रोडवर पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सहायक पोलीस निरीक्षक विवेक नार्वेकर, शिपाई वालदे, चकोले, वेदक, दराडे, राठोड, रॉबीन साठे, गायधने मेहर यांनी सापळा रचून त्यांना पकडले. गोंदिया शहरात वाढलेल्या अवैध धंद्यांमुळे बालकांमध्ये गुन्हेगारी वाढत आहे.ऑनलाईन शॉपिंगचा असाही वापरधावपळीच्या जीवनात विविध सामांनाची खरेदी सोपी व्हावी यासाठी आॅनलाईन शॉपिंग अत्यंत फायद्याची ठरत आहे. घरगुती सामानापासून आता किरानाही आॅनलाईन बोलाविता येतो. त्यात मात्र आता हत्यारेही मागविली जाऊ लागल्याचे कान्हा शर्माच्या खूनातून उघडकीस आले. आरोपींनी वापरलेले चाकू ऑनलाईन मागविण्यात आले असून आॅनलाईन शॉपिंगचा आता असाही वापर होत असल्याचे बघून सर्वच अवाक् झाले आहेत.
ऑनलाईन मागविले होते ‘ते’ दोन चाकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 06:00 IST
अल्पवयीन बालकांमध्ये भर चौकात खून करण्याचे वाढलेले धाडस हे समाजात गुन्हेगारी कशी डोके वर उचलू पाहात आहे याचे हे मोठे उदाहरण आहे. सहजरित्या घातकशास्त्रही ऑनलाईनच्या माध्यमातून सहज मिळविता येतात हे या प्रकरणावरून लक्षात येते. गुन्हेगारीसाठी आता ऑनलाईनचा आधार घेतल्या जात आहे.
ऑनलाईन मागविले होते ‘ते’ दोन चाकू
ठळक मुद्देकान्हा शर्मा खून प्रकरण : दीड महिन्यांपूर्वी मागविले होते