शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

दीड हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 21:17 IST

मागील दोन दशकापाूसन उपेक्षित असलेला बेवारटोला प्रकल्प पूर्ण झाल्यास आणि कालवे, पाण्याच्या वितरीका पूर्ण झाल्यानंतर दरेकसा परिसरातील जवळपास दीड हजार हेक्टर शेती सुजलाम सुफलाम होईल. १५ गावातील शेतकऱ्यांना याची मदत होवू शकते.

ठळक मुद्देसंडे अँकर । १५ गावातील शेतकऱ्यांना होणार मदत । दोन्ही हंगामातील पिकांना मिळू शकेल पाणी

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मागील दोन दशकापाूसन उपेक्षित असलेला बेवारटोला प्रकल्प पूर्ण झाल्यास आणि कालवे, पाण्याच्या वितरीका पूर्ण झाल्यानंतर दरेकसा परिसरातील जवळपास दीड हजार हेक्टर शेती सुजलाम सुफलाम होईल. १५ गावातील शेतकऱ्यांना याची मदत होवू शकते.परंतु प्रकल्पाचे काम अर्धवट पडून असल्याने मागील अनेक वर्षापासून या परिसरातील शेती वरथेंबी पावसावरच अवलंबून असून सिंचनाच्या सोयीची प्रतीक्षा करीत आहे.बेवारटोला धरणाचा जलाशय साठा ७.९६८८ दशलक्ष घनमिटर आहे. मृत साठा ०.७२४८ दशलक्ष घनमिटर आहे. या धरणाची लांबी ९८० मिटर आहे. धरणाची महत्तम उंची १९.३० मिटर एवढी राहणार आहे. या धरणामध्ये एकूण पाण्याचा येवा १६.२२१ दशलक्ष घनमिटर पेक्षा जास्त असून धरणाच्या क्षमतेपेक्षा दुप्पटच्यावर राहणार आहे. प्रकल्पाची सिंचन क्षमता १७४२ हेक्टर असून या धरणातील दोन्ही कालव्यातून १३७९ हेक्टर शेतीला थेट लाभ मिळेल. तसेच या प्रकल्पांतर्गत २३१५ हेक्टर क्षेत्राचा लाभ क्षेत्रामध्ये समावेश असेल. बेवारटोला प्रकल्पासाठी ४९.६०२ हेक्टर वनजमिन आणि १४४.६४ हेक्टर खासगी जमिन अधिगृहीत करण्यात आली होती. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेलगत असलेल्या या धरणामध्ये छत्तीसगड राज्यातील नदी नाल्यांचा पाणी आणि या भागात मोठमोठे पर्वत रांग असल्याने त्यावरुन पडणारे पाणी सुद्धा वर्षभर संग्रहीत होते. त्यामुळे या धरणाच्या पाण्यामुळे शेतीला भरपूर सिंचन सोय होऊ शकतो. ऐवढेच नाही तर खरीप आणि रबी हंगामालाही भरपूर पाणी मिळू शकतो. एखाद्या वर्षी पर्जन्यमान कमी असला तरी या धरणात पाण्याचा साठा कमी पडणार नाही. दरवर्षी उन्हाळी धानपिकासह रबी हंगामातील इतर पिके सुद्धा घेतल्यास पाण्याची कमी भासणार नाही.या भागाची शेती सुद्धा ऐवढी सुपीक आहे की या जमिनीला सिंचनाची सोय झाल्यास कोणतीही पीक घेता येऊ शकते. अशात या भागाचा शेतकरी नफ्याची शेती करण्यासाठी नगदी पिके घेऊ शकतात. या भागात गरीब आदिवासी शेतकरी मोठ्या आशेवर आहेत.पुढाकार घेण्याची गरजबेवारटोला प्रकल्प आणि त्याचे कालवे अपूर्ण असून मागील दोन दशकापासून या क्षेत्रातील शेतकरी प्रकल्प पूर्ण होण्याची आतुरतेने वाट बघत आहेत. याचा मुख्य कारण म्हणजे या भागातील शेतकºयांच्या नेतृत्व करीत पुढाकार घेणाºया कणखर व्यक्तीची नेहमी कमतरता राहीली. काही स्थानिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी या प्रकल्पाची समस्या उचलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना आपला प्रस्ताव यशस्वीपणे मांडता आला नाही. बेवारटोला प्रकल्प पूर्ण झाल्यास दरेकसा परिसरातील मुख्य आठ गावासह जवळपास १५ गावातील ५०० ते ६०० शेतकरी समृद्ध शेती करेतील. यात टोयागोंदी, चांदसूरज, विचारपूर, ठूबरुटोला, कोपालगड, दल्लीटोला, जमाकुडो, पठाणटोला, तेलीटोला, बंजारी, डहाराटोला, भर्रीटोला, धनेगाव, दलदलकुही व इतर छोट्या गावांना लाभ मिळू शकतो.बेवारटोला प्रकल्प पूर्ण झाल्यास आदिवासी गरीब शेतकऱ्यांच्या शेतात पाणी मिळून या भागातील शेतकरी व शेतमजूर प्रगतीच्या वाटेवर येऊ शकतात. शासनाने याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे.- शंकरलाल मडावीआदिवासी सेवक दरेकसा

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प