शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

दीड लाख निराधारांना आवास योजनेची प्रतीक्षा

By admin | Updated: November 4, 2014 22:41 IST

निराधारांंना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी हक्काचा निवारा देण्यासाठी शासनाकडे वेगवेगळ्या नावांनी निवारा योजना अस्तित्वात आणल्या. मात्र त्यावर खर्च करण्यासाठी निधीच हाती

अपूर्ण निधी : अनेकांचे संसार उघड्यावर, जनप्रतिनिधींचे प्रयत्न अपुरेयशवंत मानकर - आमगावनिराधारांंना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी हक्काचा निवारा देण्यासाठी शासनाकडे वेगवेगळ्या नावांनी निवारा योजना अस्तित्वात आणल्या. मात्र त्यावर खर्च करण्यासाठी निधीच हाती नसल्याने या योजना निराधारांंसाठी फक्त मृगजळ ठरत आहेत. संपूर्ण जिल्हाभरात निराधारांसाठी असलेल्या आवास योजना निधीअभावी रखडल्या असून गरिबांना निवाऱ्यांचा आधार मिळणे बंद झाले आहे.राज्य शासनाने नागरिकांना निवाऱ्याची सोय उपलब्ध व्हावी यासाठी राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना, रमाई आवास योजना, इंदिरा गांधी आवास योजना तसेच वाजवी दरात हक्काचे घर मिळावे यासाठी म्हाडा योजना अस्तित्वात आणली. या योजनांच्याअंतर्गत दारिद्रय रेषेखालील नागरिकांना वाजवी दरात निवाऱ्याची सोय व्हावी यासाठी सोय करण्यात आली. शासनाच्या सकारात्मक धोरणांमध्ये जिल्हा पातळीवर दारिद्रय रेषेखालील नागरिकांना मागणीनुसार निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनही करण्यात येत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात निवाऱ्यांची सोय गरिबांना होणे अपेक्षित होते. त्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमाने नोंदणीही करण्यात आली आहे. परंतु हक्काच्या निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देण्यात प्रशासन मागे पडले आहे. त्यामुळे हजारो कुटुंबांचा संसार उघड्यावरच मांडलेला दिसत आहे. जिल्ह्यात १ लाख ४४ हजार १८६ नागरिक निवाऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाच्या इंदिरा गांधी आवास योजना, रमाई आवास योजना, राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना यामध्ये निवारा मिळावा यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या माध्यमाने मागणी केली आहे. अनुसूचित जातीमधील १६ हजार ३५६, अनुसूचित जाती २१ हजार ४४८, अल्पसंख्याक ११८५, इतर ५७ हजार ६१८ व प्रलंबीत ४७ हजार ४७८ याप्रमाणे यादीतील इच्छुकांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. परंतु निधीअभावी ती यादीच मंजूर होत नाही. त्यामुळे हक्काचा निवारा असे अनेकांसाठी स्वप्नच ठरत आहे. जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेतील नागरिक आपले संसार उघड्यावर सजवत असून नैसर्गिक आपत्तीलाही या नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या गतीमान नैसर्गिक परिणामांना नागरिक बळी ुपडत आहेत. परंतु त्यांच्या जीवन जगण्याच्या दृष्टीकोणाला आपले करणारी पाऊलवाट अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. निवारा योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधी मिळावा म्हणून जनप्रतिनिधींनी कधी शासनाकडे लढा दिला नाही. नागरिक दररोज प्रशासकीय कार्यालयांकडे निवारा मंजुर होणार काय? असा प्रश्न करीत पायपीट करीत आहेत. राज्यात नव्या दमाने सत्तारूढ झालेले शासन या गरीबांना हक्काचे निवारे मिळवून देण्यास समर्थ ठरेल का? आणि सत्तारूढ पक्षाचे येथील लोकप्रतिनिधी त्यासाठी जोर लावतील का? अशी प्रतिक्रिया उमटत आहे.