शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

गोंगले येथील कालादेव मंदिर विकासाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: July 5, 2014 23:39 IST

सडक/अर्जुनी तालुक्यातील कालादेव मंदिर हे कुणबी समाजाचे कुलदैवत म्हणून मानल्या जात आहे. गोंगले येथील कालादेव मंदिर हे शेकडो वर्षापासून प्रसिध्द जागृत देवस्थान आहे. या मंदिरात कालादेव बाबा,

राजेश मुनिश्वर - सडक/अर्जुनीसडक/अर्जुनी तालुक्यातील कालादेव मंदिर हे कुणबी समाजाचे कुलदैवत म्हणून मानल्या जात आहे. गोंगले येथील कालादेव मंदिर हे शेकडो वर्षापासून प्रसिध्द जागृत देवस्थान आहे. या मंदिरात कालादेव बाबा, सिंगऱ्या-बिंगऱ्या देव, सती देव आदी देवी-देवतांच्या मूर्त्या या काला देव मंदिरात पाहावयास मिळतात. परंतु हे देवस्थान विकासपासून कोसो दूर आहे.सडक/अर्जुनी तालुक्यातील वडेगाव, चिरचाडी, परसोडी, खजरी, कोकणा, मनेरी, कनेरी, सौंदड, डोंगरगाव/खजरी, पुतळी, शेंडा, रेंगेपार, नवाटोला, पांढरी, मालीजुंगा, खाडीपार, डव्वा, घोटी, हेटी, जांभळी, पळसगाव, कोसमतोंडी, घटेगाव, केसलवाडा, पांढरवाणी, बाम्हणी, खडकी, राका, चिंगी, खोबा आदी गावातील कुणबी समाजातील धार्मिक लोक या कालादेव मंदिर परिसरात नेहमीच येतात. नवस फेडण्यासाठी दूरवरून भाविक भक्त मोठ्या श्रध्देने या कालादेव मंदिरात येतात. काला देव मंदिर जागृत देवस्थान असल्याची आख्यायिका असल्याचे मत वयोवृध्द व्यक्ती आजही बोलून दाखवितात. कालादेव मंदिरात दिवाळीनंतर चैत्र महिन्यात यात्रेचे आयोजन केले जाते. या यात्रेला फार दूरवरून भाविक श्रध्देने येतात. गोंगले परिसरातील भाविकांची यात्रेला फारच गर्दी असते. ही यात्रा गोंगले गाव परिसरात सर्वात मोठी यात्रा समजली जाते. या यात्रेला सर्वच धर्म पंथाचे लोक सहभागी होतात. ही कालादेव यात्रा दोन दिवस होत असते. कालादेव मंदिर हा फार पुरातन आहे. परंतु परिसरातील लोकप्रतिनिधीनी लक्ष न दिल्याने मंदिराला सभा मंडप, सुरक्षा भिंत व विजेची सुविधा नसल्यामुळे देव उघड्यावर असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कालादेव मंदिराला लागून एक लहान नदी नेहमी वाहताना दिसते. पण त्या नदीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या नसल्यामुळे भाविक भक्तांना फारच त्रास होतो त्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. या मंदिरात पूर्ण सुखसोयीची झाल्यास भाविक भक्त नेहमीच येताना दिसतील असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले. गोंगले हे गाव तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असल्यामुळे लोकप्रतिनिधीनी या मंदिराकडे लक्ष दिले नाही. लाखो लोकांचे श्रध्दास्थान असलेल्या पुरातन मंदिराकडे पाठ फिरविण्यात आली. नैसर्गिकदृष्ट्या नटलेल्या या परिसराचा विकास झाला नाही.