शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
3
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
4
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
5
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
6
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
7
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
8
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
9
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
10
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
11
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
12
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
13
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
14
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
15
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
16
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
17
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
18
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
19
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
20
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!

पाण्यासाठी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:02 PM

शहरातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी आठ दिवसांपूर्वी पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यात आले होते. मात्र या दरम्यान कालवा फुटल्याने पाणी बंद करण्यात आले. त्यामुळे हे पाणी डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचलेच नाही.

ठळक मुद्देमजीप्रा म्हणते पाणी पोहचेल : पुजारीटोलाचे पाणी सोडले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी आठ दिवसांपूर्वी पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यात आले होते. मात्र या दरम्यान कालवा फुटल्याने पाणी बंद करण्यात आले. त्यामुळे हे पाणी डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचलेच नाही. आता कालवा दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असून येत्या दोन दिवसात शहराला नियमित पाणी पुरवठा होईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी शहरवासीयांना पुन्हा वेट अ‍ॅन्ड वॉच करण्याचा सल्ला दिला जात असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्प आणि तलावांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे. तर वैनगंगा नदीचे पात्र देखील मार्च महिन्यातच कोरडे पडले.त्याचा शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. मागील महिनाभरापासून शहरवासीयांना केवळ एक वेळ पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र तो देखील नियमित होत नसून पाच ते दहा मिनिटे पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाईची समस्या गंभीर झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाला पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी उशीरा जाग आल्याने पाणी टंचाईच्या समस्येत पुन्हा भर पडली. आठ दिवसांपूर्वी शहरातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी सोडून ते कालव्याव्दारे डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र सालेकसा तालुक्यातील आंभोऱ्याजवळ कालवा फुटल्याने पाणी पोहचण्यास विलंब झाला. त्यानंतर रविवारी (दि.१५) पुन्हा पुजारीटोला धरणातून पाणी सोडण्यात आले. सध्या स्थितीत धरणातून १०० क्यूसेक पाणी सोडले जात असून हे पाणी डांर्गोलीपर्यंत पोहचण्यास दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. पुजारीटोला धरणातून सोडलेले पाणी सध्या आमगाव तालुक्यातील सुपलीपारपर्यंत पोहचले आहे. डांर्गोलीपासून हे अंतर ४० कि.मी.असून तिथपर्यंत पाणी पोहचण्यास दोन दिवस लागू शकतो. त्यामुळे शहरवासीयांना किमान दोन तीन दिवस पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.सिरपूर व इडियाडोह जलाशयांचे पाणी सोडलेशहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुध्दा पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. सडक अर्जुनी, तिरोडा, गोरेगाव तालुक्यातील गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. जनावरांना सुध्दा पिण्यासाठी तलाव, बोडयामध्ये पाणी नसल्याने पशुपालकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या पाहता सिरपूर जलाशयातून ६६७ क्यूसेक व इडियाडोह जलाशयातून १३० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे.