अग्रवाल : प्रचारसभा व जनसंपर्क अभियानगोंदिया : विकास कार्यांना प्रत्येक गावात पोहोचवून आम्ही विकासाची एक नवीन राजनिती सुरू केली. त्यामुळे गावागावात उत्तम रस्ते, पाण्याचा पुरवठा, सिंचनाची सोय, नवीन वर्गखोल्या, शाळांच्या सुसज्ज इमारती दिसत आहेत. मतदारांनी विकासाच्या नावावर मतदान करावे, असे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व पीरिपा आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.गोपालदास अग्रवाल यांनी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील नागरा, चांदनीटोला, कटंगटोला, नवेगाव, जब्बारटोला, पांढराबोडी, लहीटोला, कन्हारटोला, लोहारा, पिपरटोला, गिरोला, गोंडीटोला (घिवारी), लोधीटोला, नवाटोला, दतोरा, गुदमा, मोरवाही, इर्री, नवरगाव खुर्द, आसोली, नवरगावकला, कामठा, पांजरा, लंबाटोला, झिलमिली, छिपिया, चिरामनटोला, परसवाडा येथे निवडणूक प्रचारासाठी पदयात्रा काढून सभा घेतल्या. तसेच घरोघरी जावून मतदारांनी संपर्क साधला. यावेळी ते विकासाच्या नावावर मतदारांनी निर्णय घ्यावा, असे सांगत होते. सभेत आ.अग्रवाल पुढे म्हणाले की, शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या. खमारी व रजेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, केटीएस व बीजीडब्ल्यू रूग्णालयांचे नविनीकरणाचे कार्य सुरू आहे. पिकांच्या नुकसान भरपाईसाठी आम्ही राज्य शासनाकडून आर्थिक मदत मंजूर करून घेतली. या क्षेत्राच्या विकासासाठी संघर्ष करणारा आमदार होवू शकत नाही, असे होणार नाही. त्यासाठी आम्ही जाती-धर्माच्या वर जावून विकासाचे राजकारण केले. विकास कार्याला पुन्हा गती देण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे आणि विकासाच्या नावावरच मी मत मागण्यासाठी आलो आहे. मला निवडून विकासाची पुन्हा संधी द्यावी, असे ते म्हणाले.यावेळी जि.प. सदस्य रमेश लिल्हारे यांनी भारतीय जनता पक्षावर आगपाखड करून अग्रवाल यांना विजयी करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी पं.स. सभापती सरिता अंबुले, उपसभापती चमन बिसेन, श्याम गणवीर, कृउबासचे उपसभापती धनलाल ठाकरे, जिल्हा काँग्रेसचे महासचिव अमर वराडे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
विकास कामांवरच मतदारांनी घ्यावा निर्णय
By admin | Updated: October 1, 2014 23:25 IST