शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीवर अत्याचार! काका २३ वर्षे खडी फोडणार; प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाचा निकाल  

By अंकुश गुंडावार | Updated: December 13, 2023 19:13 IST

१७ वर्षांच्या पीडितेची आई मरण पावल्याने ती आपल्या वडील व सावत्र आईसोबत राहत होती.

गोंदिया : १७ वर्षांच्या पीडितेची आई मरण पावल्याने ती आपल्या वडील व सावत्र आईसोबत राहत होती. दरम्यान, सप्टेंबर २०१९ मध्ये ती पाहुणी म्हणून तिच्या मावशीकडे गेली. आरोपी काकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्या आरोपीला १३ डिसेंबर रोजी प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने २३ वर्षांचा सश्रम कारावास सुनावला आहे. ही सुनावणी प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी केली.मावशीकडे पाहुणी म्हणून गेलेल्या पीडितेवर घरी कुणीही नसताना तिच्या एकटेपणाचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. यासंदर्भात कुणाला सांगितले तर तुझ्या मावशीला ठार करीन, अशी धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला होता.

 काही दिवसांनी ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे घरच्या लोकांना कळल्यानंतर व पीडितेने अर्जुनी-मोरगाव पोलिसांत एप्रिल २०२० मध्ये तक्रार केली होती. तत्कालीन तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक पी. डी. भुते यांनी सविस्तर तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र सादर केले. या प्रकरणात आरोपीविरुद्ध दोष सिद्ध करण्यासाठी सरकार व पीडित पक्षातर्फे विशेष सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांनी एकूण १३ साक्षीदारांना न्यायालयासमोर तपासले व बचाव पक्षाच्या दोन साक्षीदारांची उलट तपासणी केली होती. एकंदरीत आरोपीचे वकील व सरकारी वकील यांच्या सविस्तर युक्तिवादानंतर प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी आरोपीविरुद्ध सरकारी पक्षाचा पुरावा, न्यायवैद्यक तपासणी अहवाल, डीएनए अहवाल, वैद्यकीय अहवाल हे पुरावे ग्राह्य धरून आरोपी अशोक ऋषी मेंढे याला शिक्षा सुनावली. या प्रकरणात जिल्हा पोलिस अधीक्षक निखील पिंगळे व पोलिस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनात पैरवी कर्मचारी पोलिस हवालदार क्रिष्णाकुमार अंबुले यांनी काम पाहिले. अशी सुनावली शिक्षाबालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, अधिनियम, २०१२चे कलम ६ अंतर्गत १० वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ४ महिन्यांचा अतिरिक्त कारावास, भारतीय दंड विधानाचे कलम ३७६ (२) (एन) (एफ) अंतर्गत १० वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ४ महिन्यांचा अतिरिक्त कारावास, तसेच भारतीय दंड विधानाचे कलम ५०६ अंतर्गत ३ वर्षांचा सश्रम कारावास व २ हजार ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास ४ महिन्यांचा अतिरिक्त कारावास, असा एकूण २३ वर्षांचा सश्रम कारावास व एकूण २२ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेमधून २० हजार रुपये पीडितेस सानुग्रह भरपाई म्हणून देण्याचे आदेश केले आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदियाCourtन्यायालय