शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

विदर्भाचा लढा तीव्र करावा लागेल

By admin | Updated: September 20, 2016 00:56 IST

१९०५ पासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी असून त्यासाठी लढा सुरू आहे. २८ सप्टेंबर १९५३ ला

राम नेवले : विदर्भ राज्य आंदोलन समितीची जाहीर सभा परसवाडा : १९०५ पासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी असून त्यासाठी लढा सुरू आहे. २८ सप्टेंबर १९५३ ला विदर्भाला जनतेची सम्मती न घेता जबरन महाराष्ट्रात सामील केले. तेव्हापासून वैदर्भीय जनतेवर अन्याय सुरू आहे. यामुळे आता विदर्भाचा लढा तिव्र करावा लागणार असल्याचे प्रतिपादन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम येवले यांनी केले. जवळील ग्राम कवलेवाडा येथील विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या जाहीर सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पुढे बोलताना येवले यांनी, नागपूर करारानुसार २३ टक्के नोकरी विदर्भातील युवकांना द्यायची होती. फक्त आठ टक्के दिल्याने चार लाख नोकऱ्यांचा बॅकलॉग विदर्भात तयार झाला व बेरोजगारी वाढली. भारनियमन विदर्भात, वीज तयार होते विदर्भात व ३४ टक्के गळतीही विदर्भात, ६३०० मेगावॉट वीज तयार होऊनही विदर्भाला फक्त २२०० मेगावॉट दिली जाते. विदर्भाला विजेची गरज नसतानाही १३२ वीज प्रकल्प आणून ८६ हजार ४०७ मेगावॉट वीज तयार करून दिल्ली व मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडोर करिता पुरवठा केला जाणार. यासाठी एक लाख एकर सुपीक जमीन प्रकल्पाला जाईल. ९० हजार एकर टॉवरलाईनमुळे शेतीचे उत्पादन घटणार व उष्णतामान वाढणार आहे. संपूर्ण विदर्भ कँसर, टिबी व ह्दयरोगाने ग्रस्त होणार. शेतीमालाला भाव मिलत नसल्याने कर्जापोटी ३६ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. वीज नाही, पाणी नाही, शेतीपर्यंत रस्ते नसल्याचे सांगीतले. अशात वेगळे झालो तर १०० टक्के नोकऱ्या विदर्भाच्याच तरूणांना मिळणार. गडकरी व फडणवीस यांनी निवडणुकीच्या वेळी आश्वासन दिले. जनतेने शिक्ला मारताच सत्तेत आल्यावर त्यांना भान राहिले नाही. यासाठी विदर्भातील जनतेने ३ व ४ आॅक्टोबर ला तिव्र आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी माजी आमदार दिलीप बंसोड, आनंद वंजारी, जिल्हाध्यक्ष टी.बी.कटरे, अर्चना नंदघळे, अ‍ॅड. पराग तिवारी, अ‍ॅड.हेमलता पतेह, अ‍ॅड. माधुरी रहांगडाले, सुरेश धुर्वे, शामराव झरारिया, कृष्णकुमार दुबे, मोसीन खान, योगेश अग्रवाल, सरपंच देवल पारधी, ईश्वर रहांगडाले यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्तावीक जिल्हाध्यक्ष कटरे यांनी मांडले. संचालन हुपराज जमईवार यांनी केले. आभार शामराव झरारिया यांनी मानले. कार्यक्रमासाठी संजय मेश्राम, मनोज तुरकाने, मंदाकिनी गाडवे, सरिता चव्हाण, पुरनलाल भैरम, क्रांतीकुमार सावळे, सोनू पारधी आदिंनी सहकार्य केले. (वार्ताहर )