कोरोनाचा प्रकोपाचा शेतकरी ठरतोय बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:00 AM2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:00:23+5:30

गोंदिया जिल्ह्यात धान हे मुख्य पीक आहे. दैनंदिन आर्थिक व्यवहार करता यावेत, यासाठी शेतकरी काही गुंठ्यात नगदी पिके घेतात. वांगी, मिरची, टमाटर, भेंडी, चवळी, कोबी ही भाजीपाल्यासारखी नगदी पिके घेतली जातात. लग्नसराईत प्रचंड मागणी असते. मात्र यावर्षी नेमक्या याच काळात देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. विवाह सोहळे रद्द करावे लागले. अनेकांनी भाजीपाल्याची मागणी नोंदवली होती.संचारबंदीमुळे घराबाहेर निघून बाजारात एवढा उत्पादित भाजीपाला विकणे शक्य झाले नाही. अशातच उभ्या झाडावरच वांगी पिकली. अखेर हेमने या शेतकºयाला सुमारे ६ क्विंटल वांगी फेकून द्यावी लागली.कोरोनाचा यापद्धतीने शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

The victim of the Corona outbreak is becoming a victim | कोरोनाचा प्रकोपाचा शेतकरी ठरतोय बळी

कोरोनाचा प्रकोपाचा शेतकरी ठरतोय बळी

Next
ठळक मुद्देविवाह समारंभ रद्द झाल्याने वांगी फेकली । मोठे आर्थिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वांगी हे नगदी पीक आहे. लग्नसराईत प्रचंड मागणी असते. काही आॅर्डर पण घेतले. मात्र कोरोनाच्या प्रकोपामुळे विवाह समारंभ रद्द झाले. प्रतीक्षा करता करता वांगी झाडावरच पिकली. अन अखेर ती शेताबाहेर फेकून देण्याची वेळ बाकटी येथील भास्कर हेमने या शेतकऱ्यावर आली.
गोंदिया जिल्ह्यात धान हे मुख्य पीक आहे. दैनंदिन आर्थिक व्यवहार करता यावेत, यासाठी शेतकरी काही गुंठ्यात नगदी पिके घेतात. वांगी, मिरची, टमाटर, भेंडी, चवळी, कोबी ही भाजीपाल्यासारखी नगदी पिके घेतली जातात. लग्नसराईत प्रचंड मागणी असते. मात्र यावर्षी नेमक्या याच काळात देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला.
विवाह सोहळे रद्द करावे लागले. अनेकांनी भाजीपाल्याची मागणी नोंदवली होती.संचारबंदीमुळे घराबाहेर निघून बाजारात एवढा उत्पादित भाजीपाला विकणे शक्य झाले नाही. अशातच उभ्या झाडावरच वांगी पिकली. अखेर हेमने या शेतकºयाला सुमारे ६ क्विंटल वांगी फेकून द्यावी लागली.कोरोनाचा यापद्धतीने शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
हेमने यांनी दोन एकर शेतीत टमाटर, वांगी व मिरची पिकांची लागवड केली आहे. या पिकाचे काय होणार या विवंचनेत ते अडकले आहेत. शेतकरी मोठा असो की लहान,शेती कोरडवाहू असो की बागायती. शेतात धान असो की भाजीपाला. आज जिल्ह्यातील एकही शेतकरी विवंचनेतून सुटलेला नाही. शेतकºयांच्या नशिबात काय लिहिले आहे तेच कळत नाही. काल परवापर्यंत हाच शेतकरी खुश होता. मात्र कोरोनासारखे संकट घोंगावेल व आपली अशी दैना होईल असे या शेतकºयाला वाटले नव्हते.
या भाजीपाला पिकविणाºया शेतकºयांचे हाल आहेत. कधी कधी त्याने बाजारात माल आणण्यासाठी खर्च केलेल्या भाड्याचेही पैसे त्याला माल विकून मिळत नाही. अशाही अवस्थेत शेतकरी कसाबसा उत्पादन घेतो.त्यातही असे येणारे विघ्न शेतकºयांचे कंबरडे मोडतात हे नक्की.यंदा खरीप आणि रब्बी हंगामात शेतकरी सातत्याने नैसर्गिक संकटाला तोंड देत आहे. नैसर्गिक संकटातून सावरत असतानाच शेतकºयांना आता कोरोनारुपी संकटाला तोंड द्यावे लागत असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

Web Title: The victim of the Corona outbreak is becoming a victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती