शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

वाहनांचे नंबर प्लेट झाले शो-पीस

By admin | Updated: December 18, 2014 22:58 IST

नियमानुसार वाहनांच्या नंबर प्लेटवर साध्या पद्धतीने वाहनाचे क्रमांक लिहिण्याचा नियम असताना शहरात फॅन्सी नंबर प्लेट असणारे अनेक वाहन राजरोसपणे धावत असल्याचे चित्र दिसून येत आहेत.

गोंदिया : नियमानुसार वाहनांच्या नंबर प्लेटवर साध्या पद्धतीने वाहनाचे क्रमांक लिहिण्याचा नियम असताना शहरात फॅन्सी नंबर प्लेट असणारे अनेक वाहन राजरोसपणे धावत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. त्यावर नंबरसुद्धा अशा पद्धतीने लिहिले असतात की त्यांना वाचणेसुद्धा अशक्य असते.या प्रकाराने हे नंबर प्लेट आहेत की शो-पीस की प्रेमाचे स्लोगन हे सांगणेसुद्धा कठीण आहे. विशेष म्हणजे शहराच्या लोकसंख्या वाढीसह वाहनांच्या संख्येतही वाढ होत आहे. युवा वर्गाची आवडही दुचाकी वाहनांकडे तीव्रतेने वाढत आहे. परंतु युवा वर्ग निमयांचे उल्लंघन करून विविध पद्धतीचे डिझाईन असणारे नंबर प्लेट आपल्या वाहनांवर लावत आहेत. वाहनांच्या नंबर प्लेटशी छेडछाड केल्यास शिक्षा व दंडाची तरतूद आहे, ही बाब शहरातील अधिकतर युवकांना माहीतच नाही. दुसऱ्या-तिसऱ्या वाहनांचे नंबर चित्रविचित्र ढंगाने लिहिले असते. ते समजण्यासच तीन-चार मिनिटांचा अशा अनेक गाड्यासुद्धा चालत आहेत की त्यांच्या नंबर प्लेटवरून नंबरच नष्ट झाले आहेत. अनेक वाहनांवर चुकीच्या पद्धतीने नाव व स्लोगन लिहिलेले आढळते. सुरक्षेच्या दृष्टीकोणातून पाहिले तर ही सर्वात मोठी धोक्याची घंटी आहे. यावरून वाहतूक किती योग्य पद्धतीने सुरू आहे, याचा अंदाज बांधला जावू शकतो. गोंदिया शहरात तर वाहतूक विभाग केवळ मूकदर्शक बणूण आहे. अशा फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांवर कारवाई होणे गरजेचे आहे. नंबर प्लेटमध्ये बदल किंवा ते फॅन्सी असणे यामुळे अपघात करून पळून जाणाऱ्या आरोपीच्या वाहनाचे नंबर माहीत होत नाही, ही मोठीच समस्या आहे. अशाप्रसंगी सुरक्षेच्या दृष्टीने नंबर स्पष्ट दिसण्यसाठी ते योग्य पद्धतीने लिहिले असणे गरजेचे आहे. शहराच्या वाहतूक विभागाचे श्रीराम सिंगणजुडे यांनी सांगितले की, फॅन्सी नंबर प्लेट वाहन धारकांवर मोटार वाहन नियम ४१/१७७ अन्वये १०० रूपये दंडाची तरतूद आहे. या अधिनियमानुसार, वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास २५ फुट दूर अंतरावरून वाहनाचे नंबर स्पष्ट दिसायला हवे. काही वाहन धारक यासाठीसुद्धा आपल्या वाहनांवर नंबर लिहीत नाही, कारण त्यांना गाडी विक्री करतेवेळी सुविधा होते. (प्रतिनिधी)