शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

तीन महिन्यापासून भाजीपाला, इंधनाचे पैसे थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 9:30 PM

जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी साहित्य पुरवठा शासन करीत असले तरी इंधन व भाजीपालासाठी देण्यात येणारा निधी मागील तीन महिन्यांपासून शाळांना दिला नाही. मार्च महिन्याचे पैसे आता दिल्याने विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाची व्यवस्था कशी करावी असा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमध्यान्ह भोजन वांध्यात। एप्रिल ते नोव्हेंबरचे ४६ लाख रुपये दिलेच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी साहित्य पुरवठा शासन करीत असले तरी इंधन व भाजीपालासाठी देण्यात येणारा निधी मागील तीन महिन्यांपासून शाळांना दिला नाही. मार्च महिन्याचे पैसे आता दिल्याने विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाची व्यवस्था कशी करावी असा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील १६६१ शाळांमध्यील लाखो विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात येते. या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाचे साहित्य शासनस्तरावरून पुरवठा करण्यात येते. परंतु ते अन्न शिजविण्यासाठी लागणारे इंधन व भाजीपाला हा मुख्याध्यापकांना खरेदी करावा लागतो.यासाठी मुख्याध्यापकांच्या खात्यात पैैसे जमा केले जातात.परंतु मार्चपासूनचे पैसे आतापर्यंत टाकण्यात आले नव्हते. दोन दिवसांपूर्वी मार्च महिन्याचे इंधन व भाजीपाल्याचे पैसे शासन स्तरावरून मुख्याध्यापकांच्या खात्यात आरटीजीएस केल्याची माहिती देण्यात आली. परंतु मुख्याध्यापकांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याची ओरड आहे.एप्रिल, मे, व जून या तीन महिन्याचे पैसे दिले नाही. मार्चचे पैसे आता दिल्याचे सांगण्यात आले.प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी इंधन किंवा भाजीपाल्याकरिता आपल्या खिशातून पैसे टाकून साहित्य खरेदी करावी लागत आहे. तीन-तीन महिने पैसे मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणे मुख्याध्यापकांना कठिण जाते.उन्हाळ्याच्या सुट्या असल्यामुळे मुख्याध्यापकांची गोची झाली नाही.आठ महिन्याचे ४८ लाख रुपये दिलेच नाहीसन २०१८ च्या एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्याचे इंधन व भाजीपाल्याचे ४८ लाख रूपये शाळांना दिलेच नाही. यासंदर्भात शाळांकडून तक्रारी शिक्षण विभागाला करण्यात आल्या.त्या तक्रारीच्या आधारे शिक्षण विभागाने शिक्षण संचालक व शासनस्तरावर माहिती दिल्यामुळे काही लोकांच्या खात्यात दोन-दोन महिन्याचे पैसे आले.परंतु अनेक शाळांना काहीच पैसे मिळाले नाही. तर पाच-पाच महिन्यांचे पैसे अनेक शाळांचे थकले आहेत.स्वयंपाकींना फक्त १५०० रुपये मानधनमुलांचे जेवण तयार करण्याचे काम करणाऱ्या स्वयंपाकीन महिलांवर जबाबदारी जास्त आणि मजुरी काहीच नाही असे म्हणण्याची वेळ आली आहे. मार्च २०१९ पूर्वी या स्वयंपाकीन महिलांना फक्त १००० रूपये मानधन देण्यात येत होते. ६०० रूपये केंद्र व ४०० रूपये राज्य शासन देत होते. परंतु आता एप्रिल २०१९ पासून केंद्राकडून ९०० तर राज्याकडून ६०० रूपये असे दीड हजार रूपये देण्यात येत आहे. तेही मानधन वेळेवर मिळत नसल्याची खंत स्वयंपाकीन महिलांची आहे

टॅग्स :Schoolशाळा