शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वणव्यामुळे वनसंपत्तीचे नुकसान

By admin | Updated: March 31, 2016 01:58 IST

तालुक्यातील जंगलामध्ये अनेक ठिकाणी वनव्यामुळे वन संपत्तीचे मोठे नुकसान झाल्याचे जिवंत दृश्य दिसून येत आहेत.

वन्यजीवांना धोका : मोहफुले वेचणाऱ्यांवर नियंत्रणाची गरजसालेकसा : तालुक्यातील जंगलामध्ये अनेक ठिकाणी वनव्यामुळे वन संपत्तीचे मोठे नुकसान झाल्याचे जिवंत दृश्य दिसून येत आहेत. जंगलामध्ये आग लागण्याच्या घटना सतत घडत असतानासुद्धा वनविभागाचे कर्मचारी आपले कर्तव्य योग्यरित्या पार पाडून वणवा नियंत्रित करण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत. तर दुसरीकडे वनव्यामुळे लाख मोलाची वृक्षसंपत्ती आणि तृणभक्षी वन्यजीव नष्ट होण्याच्या मार्गावर दिसत आहेत. त्यामुळे पर्यावरणातील संतुलन बिघडण्यासाठी हे वणवे कारणीभूत ठरत आहेत.सालेकसा तालुक्यात लोकसंख्येचे घनत्व कमी आहे. या तालुक्याला निसर्गाने अनमोल संपत्तीच्या रुपात पर्वत, नद्या, जंगले, वन्यपशू, पक्षी, तलाव, झरे, दऱ्या इत्यादी वरदान स्वरुपात दिले आहे. परंतु ही संपत्ती योग्यप्रकारे संरक्षण केली जात नाही. नैसर्गिक संपत्तीचे नुकसान करण्यामागे काही स्वार्थी तत्व लागले असतात. तसेच शासनाने ज्या लोकांना नैसर्गिक संपत्तीच्या रक्षणाची मोठी जबाबदारी दिली, तो वन विभाग आपल्या कर्तव्याचे योग्य पालन न करता किंवा त्यांना जनतेचे योग्य सहकार्य लाभत नसल्यामुळे यंत्रणा नेहमी अपयशी ठरत आहे, हे या तालुक्याचे दुर्भाग्यच मानावे लागेल.दरवर्षी पानगडीचा मोसम सुरू होताच जंगलातील झाडांची पाने गडून खाली पडतात. हळूहळू झाडांची सर्व पाने खाली पडतात आणि पालापाचोळ्याचा एक जाड थर जमिनीवर बनतो. एवढ्यात मार्च महिन्यापासून तापमानात वाढ होत असल्याने जमिनिवर पडलेला पाळापाचोळा वाळतो. तसेच अनेक वृक्षसुद्धा वाळतात. एवढेच नव्हे तर जंगलात झाडांपासून तुटून पडलेले, कापलेले किंवा वादळी वाऱ्यामुळे उखडून पडलेले अनेक मोठे वृक्ष आणि फांद्या सुकलेल्या वाळलेल्या स्थितीत पडून असतात. एवढ्यात जंगलाला आग लागली की, संपूर्ण जंगल परिसरात वणवा भयावह रुप धारण करतो. त्यात पालापाचोळ्यासह किमती लाकूडसुद्धा जळून खाक होतात व लाख मोलाचे किमती लाकूड नष्ट होते. तसेच पालापाचोळ्याखाली विचरण करीत असलेले अनेक छोटेमोठे कीटक, साप व इतर शेकडो प्रकारचे सरपटणारे जीवसुद्धा आगीत होरपडून मरतात. एकदा वणवा लागला की संपूर्ण जंगल परिसर व उंच पहाडापर्यंत वणवा भयावह रुप घेतो. त्यामुळे पहाडावरीलसुद्धा किमतीवृक्ष व प्राणी धोक्यात येतात. पानगडी ओसरल्यावर वसंत ऋतूमध्ये सर्व छोट्यामोठ्या झाडांना नवीन पालवी व पाने फुटतात. ही हिरवळ वनस्पती तृणभक्षी प्राण्यांसाठी आवडता आहार असते. परंतु वणव्यामुळे जमिनीवरील सर्व हिरवे गवत, पालवी, पानेसुद्धा जळून जातात. तसेच वणव्याच्या भडका उंच झाडापर्यंत पोहोचल्याने झाडांची पानेसुद्धा जळून पडतात. त्यामुळे हरीण, सांभार, चितळ, ससा व इतर तृणभक्षी प्राण्यांचे आहार नष्ट होते. त्यामुळे तृणभक्षी प्राण्याचे जंगलातून पलायन होते. कधी कधी ते प्राणीसुद्धा वणव्याच्या जाळ्यात येतात आणि जीव गमावून बसतात. वनव्यामुळे पक्ष्यांची घरटी व त्यातील अंडी, पिल्लेसुद्धा नष्ट होतात. एकंदरीत वणव्यामुळे मोठ्या प्रमाणात वनस्पती, प्राणी, पक्षी इत्यादी संपत्तीची क्षती होते.तालुक्यात बिजेपार, दरेकसा आणि पिपरीया परिसरात मोठ्या प्रमाणावर घनदाट वनांनी वेढलेले क्षेत्र आहे. यात इमारती लाकूड, औषधीय गुणांनी भरपूर वृक्ष, फळदार वृक्ष तसेच विविध प्रकारच्या फर्निचरसाठी उपयोगी किमती लाकूड देणारे वृक्ष भरपूर प्रमाणात आढळतात. तसेच तृणभक्षी व हिंसक प्राण्यांचेही विचरण या जंगलात असते. तालुक्यासाठी ही एक मोठ्या अभिमानाची बाब आहे, परंतु दरवर्षी वणव्यामुळे लाखोची वनसंपत्ती नष्ट होते, हे वास्तव आहे. वणवा कशामुळे लागतो?जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर मोहफुलांची झाडे आहेत. मार्च, एप्रिलमध्ये या झाडांना फुले येतात. मोहफुले खाली पडल्यावर त्याला वेचणारे लोक झाडाखाली पालापाचोळा पडलेला असल्यास त्याला हटविण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी आग लावतात. ती आग झाडाखालच्या परिसरापुरतीच मर्यादित न राहता संपूर्ण जंगलात पसरते आणि वणव्याचे रुप धारण करते. जंगलात वावरणारे काही लोक बिड्या ओढतात, बिड्या सुलगवतात. जळत असलेली आगपेटीची कांडी जंगलात फेकतात किंवा जळत असलेली बिडी अर्धवट पिऊन जंगलात फेकतात. त्यामुळेही जंगलात वणवा लागतो. बांबूच्या रांझ्या एकमेकांना रगडत असतानासुद्धा आग निर्माण होण्याची शक्यता असते. परंतु असे क्वचितच होते. अधिकतर जंगलात लागलेली आग ही जंगलासाठी दयादृष्टी न दाखविणाऱ्या लोकांमुळेच लागते आणि वणव्याचे रूप धारण करते.सदर लोकमत प्रतिनिधी तालुक्यातील जंगल परिसरात फिरत असता बिजेपार, दरेकसा क्षेत्रातील जंगलामध्ये अनेक ठिकाणी भीषण वणवा लागल्या नंतरचे दृश्य दिसून आले. हिरवेगार जंगल निर्जन क्षेत्रासारखे दिसून येत होते. लाख मोलाचे किमती लाकूडसुद्धा जळताना दिसून आले. तसेच तिथून निघणारे धूर जंगलातील शुद्ध वातावरणाला प्रदूषित करीत असल्याचे दिसत होते. हा सर्व प्रकार थांबविण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज असून अधिकाऱ्यांनी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यावर भर देणे गरजेचे आहे.