शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, रब्बी धानपिकांचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 15:52 IST

बुधवारी आलेल्या वादळी पावसाचा तडाखा कापणी केलेल्या ६ ते ७ हजार हेक्टरमधील धानाला बसला. धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

गोंदिया : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्यात अवकाळी पाऊस अधूमधून हजेरी लावत आहे. बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह अनेकांची तारांबळ उडाली होती. तोक्ते वादळाच्या पार्श्वभुमीवर हवामान विभागाने काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. तो खरा ठरत आहे. बुधवारी (दि.१९) सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी २ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास १५ मिनिटे झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाण्याचे लोट निघाले होते. वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड झाली. तसेच काही व्यावसायीक प्रतिष्ठाणांच्या टिनच्या छताचीही पडझड झाली होती. जिल्ह्यात रब्बी धानाची कापणी आणि मळणीची कामे सुरू आहेत. त्यातच अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

बुधवारी आलेल्या वादळी पावसाचा तडाखा कापणी केलेल्या ६ ते ७ हजार हेक्टरमधील धानाला बसला. धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. हवामान विभागाने पुढील दोन तीन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला असल्याने शेतकऱ्यांवरील अवकाळीचे संकट कायम आहे. 

उघड्यावरील धानाला फटका -जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने मागील खरीप हंगामात ३३ लाख क्विंटल धान खरेदी केले. त्यांपैकी जवळपास दीड लाख क्विंटल धान उघड्यावर पडले आहे. या धानाला मागील सात आठ दिवसांपासून येत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

तुर्तास धान कापणी नकोच -यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यात एकूण ६६ हजार हेक्टरवर रब्बी धानाची लागवड करण्यात आली आहे. यापैकी ७ ते ८ हजार हेक्टरमधील धानाची कापणी पूर्ण झाली असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील बांध्यामध्ये धान पडून आहे. या धानाला बुधवारी आलेल्या अवकाळी पावसाचा फटका बसल्याने नुकसान झाले. तर हवामान विभागाने पुढील दोन तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे कृषी विभागाने तुर्तास धानाची कापणी न करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी