ंगोंदिया : नागपूर महसूल विभागांतर्गत येणार्या पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात जलसंपदा विभागात कार्यरत असणार्या अभियंत्यांना आश्वासित प्रगती योजनेचा दुसर्या टप्प्यातील लाभ गेल्या चार वर्षांपासून मिळालेला नाही. यासाठी मुख्य अभियंत्यांचा हेकेखोरपणा कारणीभूत असल्याचा आरोप संबंधित अभियंत्यांकडून केला जात आहे. प्राप्त माहितीनुसार, शासन निर्देशानुसार महाराष्टÑ शासनाच्या सेवेतील शाखा अभियंत्यांना त्यांना मिळालेल्या आश्वासित प्रगती योजनेतील १२ वर्षांच्या लाभानंतर १ एप्रिल २०१० च्या निर्णयानुसार दुसर्या टप्प्याचा लाभ अनुज्ञेय असल्याचे निर्देशित केलेले आहे. त्या निर्देशान्वये राज्य शासनाच्या सेवेतील बहुतांश अभियांत्रिकी प्रशासकांनी (मुख्य अभियंत्यांनी) शासन निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्षरित्या दुसरा लाभ देवून केलेली आहे. मात्र जलसंपदा विभागाच्या नागपूर प्रादेशिक विभागाने काही मुद्दे उपस्थित करून जलसंपदा विभागाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. मुख्य अभियंत्यांची ही भूमिका विनाकारण अडवणुकीची असल्याची शाखा अभियंत्यांची भावना आहे. ज्या मुद्यांवर त्यांनी जलसंपदा विभागाकडे स्पष्टीकरण मागितले आहे त्याबाबत कनिष्ठ अभियंता संघटनेने मुख्य अभियंत्यांना सादर केलेल्या निवेदनात काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. त्यात शासनाच्या निर्णयानुसार शाखा अभियंता/ सहायक अभियंता श्रेणी-२ यांना आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ देण्याची कारवाई अंमलात आणण्यासंबंधीचे स्पष्ट आदेश शासनाच्या वित्त विभागाच्या पत्रात दिलेले आहेत. त्यात काही गैरबाबी असल्यास त्या काढून टाकण्याचे अधिकार केवळ सामान्य प्रशासन विभागाला आहे. तरीसुद्धा मुख्य अभियंत्यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. शासन स्तरावरील कक्ष अधिकार्यांना ६५०० या मूळ वेतनश्रेणीवरून ४ वर्षानंतर ८०००-१३५०० ही वेतनश्रेणी देत असल्याने ६ वेतन राज्य वेतन सुधारणा अन्वये त्यांना १२ वर्षाच्या सेवेनंतर १५६००-३९१०० व पे ग्रेड रूपये ६६०० देण्यात आलेला आहे. ही सर्व वेतन श्रेणीतील सुधारणा राज्य शासनाच्या आश्वासित प्रगती योजना लागू झाल्यानंतर केलेली आहे. त्यामुळे शाखा अभियंत्यांना दुसरा लाभ नाकारताना त्यांच्या उच्चस्तरिय वेतनश्रेणीची तुलना कक्ष अधिकार्यांच्या सहाव्या वेतन आयोगांतर्गत समितीने दिलेल्या वेतनश्रेणीशी करणे हे शासकीय निर्णयाशी विसंगत आहे, असेही कनिष्ठ अभियंत्यांचे म्हणणे आहे. शाखा अभियंत्यांना आश्वासित योजना टप्पा २ चा लाभ १ आॅगस्ट २०१३ पासून देत होता. मात्र नागपूर विभागाचे मुख्य अभियंता कुलकर्णी यांनी विभागातील शाखा अभियंत्यांना त्यापासून वंचित ठेवल्याने त्यांच्यात रोष पसरला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
आश्वासित प्रगती योजनेत पूर्व विदर्भावर अन्याय
By admin | Updated: May 11, 2014 00:23 IST