युनिव्हर्सल कारखाना बंद : बीआयएफआर बोर्डाने फटकारले
तुमसर : कारखाना आजारी दाखवून सुमारे २५०० हजार कामगारांना बेरोजगार करण्याचा षडयंत्र युनिव्हर्सल फेरो कारखान्याने बीआयएफआर बोर्डासमोर केला. बोर्डाने कारखाना आजारी उद्योगाच्या श्रेणीत येत नाही असा निर्वाळा देऊन कारखाना पूर्ववत सुरु करावा असा निर्देश दिला. कारखान्यावर १३८ कोटींचे वीज बिल थकीत होते. बी.आय.एफ.आर. बोर्डाने माफ करून ४६ कोटी २० लक्ष २४ हजार ३८० रुपये केले. कंपनी व्यवस्थापनाने ३१५ कामगारांचे ‘क्लोजर नोटीस’ प्रकरणाच्या निकालानंतर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.तुमसर जवळील ‘युनिव्हर्सल फेरो अँड अलाईड केमिकल लिमिटेड’ मॅग्नीज शुद्ध करणारा कारखाना आहे. सन १९९८ मध्ये कंपनी व्यवस्थापनाने कारखाना आजारी आहे. या यादीत घातला. मागील १७ वर्षापासून हा कारखाना आजपर्यंत बंद आहे. सुमारे २५०० कामगार येथे बेरोजगार झाले. मानेकनगर (माडगी) येथील शेतकऱ्यांकडून जमिनीचे विक्रीपत्र करून कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरुपी नोकरी देण्याचे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाने दिले होते. कंपनी व्यवस्थापनाने क्लोजर तथा स्वेच्छानिवृत्ती देऊन प्रथम ८०० व नंतर ३१५ कामगारांना सेवेतून काढले. कामगारांनी नंतर प्रकरण न्यायालयात दाखल केले. कंपनी व्यवस्थापनानेही न्यायालयात प्रकरण दाखल केले. दिल्ली येथील बी.आय.एफ.आर. (बोर्ड आॅफ फायनान्शीयल रिकन्ट्रक्शन) येथे याचिका दाखल केली. बोर्डाचे अध्यक्ष बी.एस. मीना तथा सदस्य जे.पी. दुआ यांनी १२ डिसेंबर २०१४ ला कारखाना प्रबंधकांना युनिव्हर्सल फेरो अँड अलाईड केमिकल्स लिमिटेड कारखाना आजारी उद्योगाअंतर्गत येत नाही. त्यामुळे कारखाना पूर्ववत सुरु करण्याचे निर्देश दिले. वीज वितरण कंपनीचे कारखान्याकडे सुमारे १३८ कोटी वीज बिल थकीत होते. ते माफ करून ४६ कोटी २० लक्ष २४,३८० रुपये करण्यात आले. कंपनी व्यवस्थापनाने ही रक्कम भरली. वीज वितरण कंपनीने न थकीत प्रमाणपत्र दि. २५ मार्च २०१४ ला दिले. कंपनी व्यवस्थापनाने बी.आय.एफ.आर. बोर्डाला आश्वासन दिले की, ३१५ कामगारांना क्लोजर नोटीस अंतर्गत बरखास्त केले होते. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात सुरु आहे.न्यायालयाच्या निर्णयानंतर योग्य निर्णय घेतला जाईल.१५ आॅगस्टला माडगी येथील ग्रामसभेत प्रस्ताव घेऊन निर्णय मंजूर करण्यात आला की, कारखाना तत्काळ सुरु करण्याकरिता भारतीय मजदूर संघाने त्याकरिता प्रयत्न करावे. तसेच एका महिन्यात कंपनी व्यवस्थापनाने मजदूर संघ प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात यावी.कारखान्यावर याचा परिणाम पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)