तापमानात वाढ : असह्य उन्हाने रस्ते होताहेत निर्मनुष्यसालेकसा : तालुक्यात कमाल तापमान ३८ ते ३९ पर्यंत राहत होते. सोमवारी १६ मे रोजी तापमानात अचानक ४ ते ५ अंशाने वाढल्याने तालुक्यात प्रचंड उकाळा वाढलेला दिसला. सूर्य आज फक्त आगच ओकणार. सोमवारचा दिवस हा सालेकसा मुख्यालयाच्या आठवडी बाजाराचा दिवस असून सुद्धा उष्णतेच्या लाटेमुळे शहराच्या मुख्य रस्त्यावर अघोषित संचारबंदी दिसून आली. आठवडी बाजार परिसरात ४ वाजतापर्यंत ग्राहकांचा तोटा दिसून येत होता.१६ मे ला दुपारी १ वाजतापर्यंत तापमान ३४ अंशच्या जवळ जाताना दिसला. आज प्रथमच उष्णतेची लाट वाहताना दिसत आली. गरम वारा वाहत असल्याने लोक घराबाहेर निघण्यास घाबरु लागले. शासकीय कार्यालयासमोर ही सुकसुकाट दिसून येत होता. अनेक लोक थंड पाण्याच्या शोधात होते. परंतु मुख्य चौकात पाणपोईची व्यवस्था नसल्याने लोक हॉटेलामध्ये धाव घेताना दिसले. परंतु हॉटेलामध्ये थंड पाणी मिळत नाही. थंड पाणी पाहिजे तर पाणी पाऊच किंवा पाण्याची बॉटल घ्या असे हॉटेलवाले किंवा पानठेले वाले बोलत होते. (तालुका प्रतिनिधी)
अघोषित संचारबंदी
By admin | Updated: May 19, 2016 01:28 IST