शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम क्षेत्रात शिक्षणाची गोडी निर्माण करणारे उके गुरुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 05:00 IST

सालेकसा तालुका मुख्यालयापासून २२ किमी अंतरावर असलेल्या विचारपूर नावाचे गाव आहे. चारही बाजूने पर्वतरांगामधे दऱ्याखोऱ्यात हे गाव वसलेले आहे. या गावामध्ये सर्वसामान्य बाहेरच्या व्यक्तीस भीती वाटते. अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भाग असून, २४ तास भयाचे वातावरण व या परिसरात राहणारे गरीब आदिवासी लोक अजूनही मोठ्या प्रमाणावर निरक्षर व अशिक्षित आहेत. मोलमजुरी किंवा वनोपजावर जीवन जगत आहेत. त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे म्हणजे मोठे आव्हानच.

विजय मानकरलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर स्थित विचारपूर येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक विनोद उके एक तंत्रस्नेही शिक्षक म्हणून ओळखले जातात. दुर्गम आदिवासी क्षेत्रातील गरीब आदिवासी व वंचित कुटुंबातील चिमुकल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्यात गणित आणि इंग्रजी विषयाबद्दल गोडी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवित असल्याने ते एक उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जातात. सालेकसा तालुका मुख्यालयापासून २२ किमी अंतरावर असलेल्या विचारपूर नावाचे गाव आहे. चारही बाजूने पर्वतरांगामधे दऱ्याखोऱ्यात हे गाव वसलेले आहे. या गावामध्ये सर्वसामान्य बाहेरच्या व्यक्तीस भीती वाटते. अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भाग असून, २४ तास भयाचे वातावरण व या परिसरात राहणारे गरीब आदिवासी लोक अजूनही मोठ्या प्रमाणावर निरक्षर व अशिक्षित आहेत. मोलमजुरी किंवा वनोपजावर जीवन जगत आहेत. त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे म्हणजे मोठे आव्हानच. मात्र या आव्हानाला सामोरे जात वंचित मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी नेहमी नवनवीन उपक्रम राबवित असल्यामुळे त्यांचे छोटे-छोटे विद्यार्थी निर्भयतेने आपल्या गुरुजींच्या सहवासात वावरत असतात. एकूण १८ वर्षांच्या नोकरीच्या काळातील तब्बल १२ वर्षे त्यांनी अतिसंवेदनशील व दुर्गम आदिवासी भागात काढले. आजही याच क्षेत्रात आपल्या ज्ञानाच्या प्रसार करीत आहेत. भरपूर संगणकीय ज्ञान असले तरी डिजिटल साधनाचा वापर आणि पारंपरिक अध्यापन पद्धतीतील काही महत्त्वाच्या गोष्टींचा अवलंबन मुलांना आनंददायी वातावरण निर्माण करीत मनोरंजन करण्यासाठी गाणी, कथा इत्यादी ऐकवून मन प्रफुल्लित करून नवसंचार निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या कृतीमुळे पालकवर्गसुद्धा त्यांच्याकडे त्यांच्या कार्याने समाधानी आहे.

बचतीसाठी केली शाळेत डीकेएस बँकेची स्थापना- विद्यार्थ्यांना पैशाच्या बचतीची सवय लागावी म्हणून शाळेत डी.के.एस नावाने बँक स्थापन करुन विद्यार्थ्यांना खाऊसाठी पालकांकडून मिळालेले पैसे या बँकेत ठेवण्यासाठी ते प्रवृत्त करतात. दिनेश उके हे एक तंत्रस्नेही शिक्षक व मार्गदर्शक असल्याने डायटने जिल्ह्यात त्यांना बोलावून जिल्ह्यातील शिक्षकांना तंत्रस्नेही बनविण्याकरिता नियुक्त करीत दोन वर्ष त्यांच्या संगणकीय ज्ञानाचा उपयोग करुन घेतला. परंतु दिनेश उके यांनी पुन्हा आपले पाऊल आदिवासी गावाकडे वळविले. आजही ते विचारपूर सारख्या अतिदुर्गम भाागातील गावात जिथे कसलीही प्रवासाची सोय नाही अशा गावातील विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देत आहे. शिक्षक दिनी त्यांच्या या कार्याला लोकमतचा सलाम.इंग्रजीचे ज्ञान वाढविण्यासाठी शब्दांची बँक- इंग्रजीचे ज्ञान वाढविण्यासाठी व विषयाबद्दल गोडी निर्माण करण्यासाठी इंग्रजी शब्द बँक उपक्रम शिक्षक उके राबवित आहे. त्यामुळे विद्यार्थी इंग्रजीपासून दूर न पळता स्वयंस्फूर्त भाग घेत असतात. विद्यार्थ्यांचा आरोग्य सुदृढ राहावा म्हणून दररोज आरोग्य विषयी मार्गदर्शन करतात. गणिताची आवड निर्माण करण्यासाठी दैनंदिनी उपयोग असणाऱ्या वस्तू संकलीत करुन वजाबाकी सह सोप्या पद्धतीने गणित शिकवितात.

 

टॅग्स :Educationशिक्षणTeacherशिक्षक