शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत दोन युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 21:01 IST

सानगडी ते साकोली मार्गावरील नर्सरी फाट्यापासून काही अंतरावर एका चारचाकी वाहनाने मोटारसायकल स्वारांना धडक दिल्याने दोन्ही युवक घटनास्थळीच ठार झाले. ही घटना आज (दि.४) दुपारी घडली.

ठळक मुद्देसानगडी ते साकोली मार्गावरील घटना : दोघांचा सामूहिक अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : सानगडी ते साकोली मार्गावरील नर्सरी फाट्यापासून काही अंतरावर एका चारचाकी वाहनाने मोटारसायकल स्वारांना धडक दिल्याने दोन्ही युवक घटनास्थळीच ठार झाले. ही घटना आज (दि.४) दुपारी घडली. निखील तुलशीदास मेंढे (२३), गुरुदेव शिवदास कोसरे (२२) रा.खांबी असे अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहे.खांबी येथील रहिवासी असलेले निखील मेंढे व गुरुदेव कोसरे हे दोन्ही युवक बजाज बॉक्सर (एमएच ३३ डी ३६३१) या मोटारसायकलने खांबी येथून साकोलीकडे जाण्यासाठी सकाळी ११ वाजता निघाले. सानगडी ते साकोली मार्गावरुन मार्गक्रमण करीत असताना नर्सरी फाटा ते वडद फाटयादरम्यान एका चारचाकी अज्ञात वाहनांने धडक दिली. यात या दोन्ही युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.त्या दोघांना साकोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. अपघाताची वार्ता गावामध्ये पोहोचताच गावचे पोलीस पाटील नेमीचंद मेश्राम व अन्य गावकरी साकोलीला गेले.अपघातामध्ये ठार झालेल्या दोन्ही युवकांची ओळख पटली. त्यानंतर त्यांचे श्वविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबीयांना देण्यात आले.सामूहिक अंत्यसंस्कारगावातील दोन होतकरु युवक एकाच ठिकाणी अपघातामध्ये ठार झाल्याने खांबी गावामध्ये सर्वत्र स्मशान शांतता पसरली होती. दोघांचीही अंतयात्रा एकत्र काढण्यात आली.गावातील मामा तलावाच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निखीलच्या पश्चात आई, एक भाऊ तर गुरुदेवच्या मागे आई-वडील, दोन भाऊ, दोन बहिणी असा बराच आप्त परिवार आहे. 

टॅग्स :Accidentअपघात