शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

पाण्याची टाकी कोसळून दोन महिला जखमी

By admin | Updated: July 19, 2015 01:28 IST

जवळील ग्राम करंजी येथे पाण्याची टाकी कोसळून त्याखाली दबल्याने दोन महिला गंभीर जखमी झाल्या. शुक्रवारी (दि.१७) सकाळी ७ वाजता दरम्यान ही घटना घडली असून ...

करंजी येथील घटना : दोषींवर कारवाईची मागणी, पोलिसात तक्रार दाखलकालीमाटी : जवळील ग्राम करंजी येथे पाण्याची टाकी कोसळून त्याखाली दबल्याने दोन महिला गंभीर जखमी झाल्या. शुक्रवारी (दि.१७) सकाळी ७ वाजता दरम्यान ही घटना घडली असून यातील एका महिलेला गोंदियातील डॉ. बजाज यांच्या हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे की, आमगाव तालुक्यातील ग्राम करंजी येथे सकाळी ७ वाजता दरम्यान गावातील महिला पाणी भरत असताना अचानक टाकी कोसळली. घटनेदरम्यान गावातीलच आशा मुकेश बागडे (२३) व पुस्तकला तेजराम हुकरे (४२) कोसळलेल्या भिंतीखाली दबून जखमी झाल्या. तर टाकीतील पाण्याच्या प्रवाहाने तेथे खेळत असलेला गुलाब काशीराम पालीवाल (१२) हा चिमुकला वाहत रस्त्यावर आला. यातील जखमींना तातडीने गोंदियाच्या केटीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर टाकीला लिकेज असल्याने पाणी वाहत राहत असे. त्यामुळे नागरिक पाण्यासाठी गर्दी करायचे असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याबाबत ग्राम पंचायतला वेळोवेळी सुचना देऊनही पक्की टाकी तयार करण्यात आली नाही असे येथील नागरिकांनी सांगितले. दरम्यान उपचारानंतर पुस्तकला हुकरे यांना सुट्टी देण्यात आली.तर आशा बागडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना डॉ. बजाज यांच्या हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. (वार्ताहर)दोषींवर कारवाईची मागणी ग्रामपंचायत करंजी येथील लोकसंख्या अडीच हजारच्या जवळपास आहे. येथील पाण्याची टाकी २०-२५ वर्षे जुनी आहे. या टाकीद्वारे वॉर्ड क्र.२ ला पाण्याचा पुरवठा होत असून याचा १५० लोकांना लाभ मिळतो. मागील १० वर्षांपासून टाकी जर्जर असल्याने तिची थातूरमातूर डागडुजी करून काम चालविले जात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मात्र कधीही यापासून धोका होण्याची शक्यता टाळता येत नसल्याने नवीन टाकी तयार करण्यासाठी सरपंच पंचफुला बागडे यांना सांगण्यात आले होते. मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही. करिता प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तंटामुक्त समिती सदस्य गणेश हुकरे, रामेश्वर शेंडे, श्रीराम शेंडे यांनी केली आहे. पोलिसांत तक्रार दाखलसदर घटनेसंदर्भात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसह आमगाव पोलिसांत रविवारी (दि.१८) जखमींच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली आहे. तसेच खंड विकास अधिकारी मून यांनी चौकशीचे आदेश पाणी पुरवठा विभागाला दिले असल्याची माहिती आहे.