शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

दोन जंगली हत्तींचा हाजराफॉल येथे मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:01 PM

तालुक्यातील वनक्षेत्रात प्रथमच दोन जंगली हत्ती छत्तीसगड राज्याकडून आले आणि जंगलात विचरण करीत हाजराफॉल येथे त्यांनी मुक्काम ठोकल्याची माहिती आहे. धबधब्याच्या पाण्याचा मनसोक्त आनंद लुटून ते पुढे निघून गेले.

ठळक मुद्देवनविभागासाठी ऐतिहासिक पर्वणी : हाजराफॉल पर्यटकांसाठी दोन दिवस बंद

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील वनक्षेत्रात प्रथमच दोन जंगली हत्ती छत्तीसगड राज्याकडून आले आणि जंगलात विचरण करीत हाजराफॉल येथे त्यांनी मुक्काम ठोकल्याची माहिती आहे. धबधब्याच्या पाण्याचा मनसोक्त आनंद लुटून ते पुढे निघून गेले. यामुळे १३ ते १५ जून दरम्यानचा कालावधी वन विभागाच्या अधिकारी-कर्मचारी आणि वन्यजीव प्रेमींसाठी पर्वणीचा ठरला.साधारणपणे जेव्हा कधी एखाद्या हत्तीचे दर्शन होते तेव्हा रस्त्याने जात असताना त्याच्या पाठीवर एक माहुत बसलेला असतो आणि हातात बरछी धरुन त्याच्यावर अंकुश ठेवतो. तर दुसरा माहुत मागे पुढे पायी चालत हत्तीचे दर्शन घडवून देण्याच्या नावावर आपल्या उदरनिर्वाहाची सोय करीत असतो.परंतु कोणत्याही माहुताच्या अंकुशात न राहता आपल्या नैसर्गिक संसारात रमलेला हत्ती बघून वेगळी अनुभूती झाल्याशिवाय राहत नाही. असाच अनुभव तालुक्यातील दरेकसा वन परिसरात काही लोकांनी प्रथमच अनुभवला.छत्तीसगड आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेला सालेकसा तालुक्याचा दरेकसा वन परिसर लांब आणि उंच पर्वतरांगा आणि घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. डोंगर क्षेत्र त्यातून वाहणारे छोटे-मोठे झरे विविध वन्यजीवांना आपल्याकडे आकर्षित करीत हजारो वन्यजीव व पक्ष्यांसाठी माहेरघर ठरत आहे.त्यामुळे आता जंगली हत्ती सारखे प्राणीही येऊन येथे मुक्काम ठोकत असल्याचे चित्र आहे. गुरूवारी (दि.१३) रात्री कोपालगड दल्लाटोला जंगलाकडे छत्तीसगड राज्यातून दोन हत्तींनी प्रवेश केला.शुक्रवारी (दि.१४) दिवसभर जमाकुडो दरेकसाच्या डोंगर रानातून आपला आहार-विहार करीत हाजराफॉल परिसरात पोहचले. हाजराफॉलच्या तलावात त्यांनी जलक्रीडा केली आणि रात्रीचा मुक्काम सुद्धा ठोकला. परिसरात इकडे-तिकडे भ्रमण करीत मध्यप्रदेश सीमेच्या दिशेने मार्गक्रम केले.पर्यटकांना दोन दिवस प्रवेश नाहीदोन जंगली हत्तीचे आगमन दरेकसा वन क्षेत्रात झाल्याचे कळताच वन विभाग सजग झाला. हत्तीच्या जोडप्याने हाजराफॉल परिसरात प्रवेश केल्याचे कळल्यावर हाजराफॉल बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना परत पाठविण्यात आले.दोन्ही हत्ती या परिसरातून दूर निघून गेल्याचे बघूनच हाजराफॉलमध्ये पर्यटकांना प्रवेश देण्याचा ठरविले. हत्तींचे कुणीही फोटो काढू नये याचीही दक्षता घेण्यात आली. हत्ती हाजराफॉल परिसरातून खूप दूरवर गेल्यावर त्यांच्या पाऊलखुना आणि लीदचे (विष्ठा) फोटो वन विभागाने काढले. पाऊलखुणांच्या आधारावर दोन्ही हत्ती कोणत्या दिशेने आले व कोणत्या दिशेत गेले याची माहिती घेतली.वन कर्मचाऱ्यांनी दिली गावामध्ये गस्तवन्य जीवन आणि मानवामध्ये संघर्ष निर्माण होऊ नये आणि मानवी वस्तीमध्ये हत्तीचा शिरकाव होणार नाही यासाठी गस्त लावून दक्षता घेण्यात आली.जंगली हत्तींना मानवाकडून कसलाही त्रास होऊ नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आली.दोन जंगली हत्तींचे हाजराफॉल परिसरात आगमन होणे म्हणजे या तालुक्याचे वन क्षेत्र पर्यटकांसाठीच नव्हे तर वन्यजीवांना पोषक वातावरण निर्माण करुन देणारे असल्याचे सिद्ध होत आहे. प्रत्येक वन्यजीवासाठी हाजराफॉलचा वन परिसर माहेरघर ठरत आहे. याचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.- अभिजीत ईलमकर, वन परिक्षेत्राधिकारी, सालेकसा.