शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार मोजले पण गुरुजींना ऑनलाईन प्रशिक्षणाचा मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2022 05:00 IST

हे प्रशिक्षण ऑनलाइन असल्याने सातत्याने अडथळे येत आहेत. परिणामी, शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रशिक्षणासाठी गोंदिया जिल्ह्यातील जवळपास २२८० हून अधिक शिक्षकांनी नोंदणी केली आहे.  त्यासाठी दोन हजार रुपये शुल्कही घेतले जाते; मात्र बहुतांश जणांना युजर आयडी, पासवर्ड मिळाला नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. त्यामुळे दोन हजार रुपये मोजून गुरुजींना ‘ऑनलाइन प्रशिक्षणाचा’ मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नोकरीची १२ वर्षे पूर्ण केलेल्या शिक्षकांना वरिष्ठ तर २४ वर्षे पूर्ण केलेल्या शिक्षकांना निवड श्रेणीसंदर्भात दरवर्षी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या वतीने प्रशिक्षण दिले जाते. यासाठी दोन हजार रुपये शुल्क घेतले जात असून, प्रशिक्षणाला १ जूनपासून सुरुवात झाली आहे. हे प्रशिक्षण ऑनलाइन असल्याने सातत्याने अडथळे येत आहेत. परिणामी, शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रशिक्षणासाठी गोंदिया जिल्ह्यातील जवळपास २२८० हून अधिक शिक्षकांनी नोंदणी केली आहे.  त्यासाठी दोन हजार रुपये शुल्कही घेतले जाते; मात्र बहुतांश जणांना युजर आयडी, पासवर्ड मिळाला नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. त्यामुळे दोन हजार रुपये मोजून गुरुजींना ‘ऑनलाइन प्रशिक्षणाचा’ मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अनेकांना युजर आयडी, पासवर्ड मिळालाच नाही 

- शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडे १२ व २४ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना नोंदणी करावी लागते. ४५ दिवसांचे प्रशिक्षण राहते. यामध्ये दररोज अर्धा तास ऑनलाइन माहिती दिली जाते.- बहुतांश शिक्षकांना युजर आयडी, पासवर्ड मिळालेला नाही. तर अनेकांनी चुकीचा पत्ता दिला असल्याने गैरसोय होत आहे. अनेक घोळामुळे शिक्षकांचा मनस्ताप वाढला आहे.

उत्तरे, व्हिडिओ अपलोड होईनाअर्धा तासाच्या प्रशिक्षणानंतर प्रश्नोत्तरे तसेच व्हिडिओद्वारे माहिती दिली जाते. मात्र, तीही वेळेवर अपलोड होत नसल्याची शिक्षकांची ओरड आहे. याबाबत विचारणा करूनही सुधारणा होत नाही.

वेबसाईट वारंवार पडतेय बंद प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी वेबसाइट बंद पडल्याचे संबंधित शिक्षकांनी सांगितले. त्यामुळे ४५ दिवसांत प्रशिक्षण पूर्ण होणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

प्रशिक्षण पूर्ण कसे होणार?- ४५ दिवसांचे हे प्रशिक्षण असते. १२ व २४ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना याद्वारे माहिती दिली जाते; मात्र वारंवार ऑनलाइन अडचणी येत असल्याने हे प्रशिक्षण वेळेत पूर्ण होणार का, असा सवाल शिक्षकांकडून होत आहे. 

ऑफलाईन प्रशिक्षण का नाही? - कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून ऑफलाइन प्रशिक्षण बंद आहे. त्यामुळे ऑनलाइनचा पर्याय आहे. - आता कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असल्याने ऑफलाइन प्रशिक्षण देण्याची मागणी आहे. 

७० टक्के प्रशिक्षण पूर्णगोंदिया जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून, दररोज अर्धा तास प्रशिक्षण घेतले जात आहे. १२ व २४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांचा यामध्ये समावेश असल्याचे शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.

 

टॅग्स :onlineऑनलाइनTeacherशिक्षक