शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
4
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
5
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
6
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
7
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
8
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
9
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
10
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
11
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
12
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
13
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
14
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
15
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
16
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
17
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
18
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
19
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
20
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?

पेट्रोल पंपावर जबरी चोरी करणारे दोघे जाळयात

By नरेश रहिले | Updated: July 15, 2024 15:41 IST

गोंदिया शहर पोलीसांची कामगिरी: ४६ हजाराचे साहित्य जप्त

नरेश रहिले गोंदिया: मूर्रीच्या साई पेट्रोल पंप येथील मजूर राहुल राजकुमार गोंडाणे (३२) रा. संजयनगर गोविंदपुर गोंदिया यांना १३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता मारहाण करणाऱ्या आरोपी कुणाल विनोद धकाते (२५) रा. चंद्रशेखर वार्ड, श्रीनगर गोंदिया व आनंद ऊर्फ लालबाल राजेश नागपुरे (२७) रा. दांडेगाव ता. जि गोंदिया या दोघांना गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली.

या आरोपींनी पेट्रोल भरल्यावर आपसात वाद केला. येथे भांडण करू नका असे राहूल म्हणाला असता त्याला आरोपींनी मारहाण करून पेट्रोलपंपच्या ड्रॉव्हर मधून १२ हजार ३०० रूपये जबरीने हिसकावून नेले होते. यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम कलम ३०९ (६) अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर, पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला. या प्रकरणात दोन्ही आरोपींकडून ६ हजार ४०० रूपये रोख व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल किंमत ४० हजार असा एकुण ४६ हजार ४००/- रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गराड करीत आहेत.

ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गराड, पोलीस हवालदार कवलपालसिंग भाटीया, जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, दिपक रहांगडाले, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, निशीकांत लोंदासे, पोलीस शिपाई अशोक रहांगडाले, दिनेश बिसेन, मुकेश रावते, सुभाष सोनवाने, सनोज सपाटे यांनी केली आहे.

टॅग्स :theftचोरीArrestअटकgondiya-acगोंदिया