शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

नागपूरहून दोघे आले अन् दीड लाखाचे दागिने चोरले; लोहिया वॉर्डात चोरी, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक

By नरेश रहिले | Updated: November 22, 2023 19:15 IST

दीड लाखाचे दागिने १४ ते १५ नोव्हेंबर दरम्यान पळविणाऱ्या नागपूर येथील आरोपीला गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

गोंदिया: रामनगर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रिंग रोड लोहिया वॉर्ड येथील योगेश चंद्रकांत ढोमणे (४१) यांच्या घरातून दीड लाखाचे दागिने १४ ते १५ नोव्हेंबर दरम्यान पळविणाऱ्या नागपूर येथील आरोपीला गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ही कारवाई २१ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. या प्रकरणात पहिला आरोपी मज्जिद करीम खान (२६) रा. बाबाताज कॉलनी, कळमना ता. जि. नागपूर याला कळमना नागपूर येथून ताब्यात घेतले. दुसरा आरोपी राजा ऊर्फ शावेज शकिल खान (४७) रा. इंदिरा माता नगर दुर्गावती चौक नागपूर याला त्याच्या घरूनच अटक केली.

रामनगर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रिंग रोड लोहिया वॉर्डातील योगेश चंद्रकांत ढोमणे हे सासुरवाडीला गेले असताना त्यांच्या घराचे कुलूप तोडून आलमारीतील २० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र किंमत ६० हजार, सोन्याचे कानाचे झुमके ४ ग्रॅम वजनाचे किंमत १२ हजार, सोन्याचे कानातील टॉप २ ग्रॅम वजनाचे किंमत ६ हजार, सोन्याच्या ५ नग अंगठ्या वजन १०.५० ग्रॅम वजनाच्या किंमती ३१ हजार ५०० रुपये, सोन्याचे डोरले १ ग्रॅम वजनाचे किमंत ३ हजार, सोन्याचा कडा वजन अर्धा ग्रॅम वजनाचा किंमत दीड हजार, चांदीची वाटी, चांदीचा चम्मच, चांदीचे दोन जोड कड्डे, एक चांदीचे ब्रेसलेट, पायाचे चांदी जोडवे १ जोडी, चांदीचे शिक्के २, चांदीचा कमरेचा आकडा १, चांदीचा करडा १, चांदीचा चाळ २ जोड असे एकूण किंमत १५ हजार तसेच रोख रक्कम ३ हजार असा एकूण १ लाख ३२ हजार रुपयांचा माल तसेच योगेश यांच्या आईच्या लोखंडी आलमारीतून १५ हजार रुपये रोख व स्वयंपाक घरातील लोखंडी आलमारीतून १० हजार रुपये रोख असे एकूण २५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख ५७ हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला होता. या प्रकरणातील दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक विजय शिंदे, सहायक फौजदार कृपाण, पोलिस हवालदार ठाकरे, पोलिस शिपाई रहांगडाले, बंजार यांनी केली आहे. चोरी केलेले दागिने एकाला विक्रीआरोपी मज्जिद करीम खॉन (२६) रा. बाबाताज कॉलनी, कळमना नागपूर व राजा ऊर्फ शावेज शकिल खान (४७) रा. इंदिरा माता नगर दुर्गावती चौक नागपूर यांच्याकडून चौकशी केल्यावर त्या दोघांनी चोरी केलेले दागिने शफिक ऊर्फ बबलू सय्यद अन्सारी (३५)रा. इंदिरा माता नगर दुर्गावती चौक नागपूर याला विकल्याचे सांगितले. परंतु शफिक ऊर्फ बबलू सय्यद अन्सारी हा फरार आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाtheftचोरी