शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
6
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
7
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
8
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
9
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
10
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
11
Bageshwar Dham: बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
12
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
13
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
14
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
15
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
16
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
17
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
18
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
19
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
20
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...

धम्मचक्र प्रवर्तन दिन थाटात

By admin | Updated: October 18, 2015 02:06 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तो दिवस जिल्ह्यात ठिकठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून थाटात साजरा करण्यात आला.

संघटना व शाळा-महाविद्यालयांचा पुढाकार : विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन गोंदिया : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तो दिवस जिल्ह्यात ठिकठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून थाटात साजरा करण्यात आला. विविध संस्था, सामाजिक संघटनांकडून यानिमित्त दररोज विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. बहुजन हिताय संघ व युवा परिवर्तन संघ गोंदिया : या संघांच्या संयुक्तवतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी संघाचे प्रदेश उपाध्यक्ष शुद्धोधन सहारे, यशपाल डोंगरे, नितीन उके, अखिलेश बोरकर, निशा शिंगाडे, बबीता खोब्रागडे, प्रीती बंसोड, विजय कोल्हे, नितीन शामकुवर, प्रकाश बागे, आकाश इंदूरकर, नितेश देशभ्रतार, सतीश मेश्राम, निखिल वासनिक व अन्य उपस्थित होते. जयभीम जनजागृती मंडळ व फुले शाहू-आंबेडकर चळवळ संस्कार केंद्र गोंदिया : येथील बाजपेई वॉर्डातील सम्यक सम्बुद्ध बौद्ध विहारात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन भिक्खु संघाचे प्रमुख भंते सोमानंद यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून महेंद्र कठाणे, मंडळाचे अध्यक्ष बाबूराव जनबंधू, उपाध्यक्ष उदेभान डोंगरे, हंसराज बंसोड, प्रेमलाल मेश्राम उपस्थित होते. १० दिवसीय कार्यक्रमात पहिल्या दिवशी धम्मरॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर विविध कार्यक्रम व स्पर्धा घेण्यात आल्या. संचालन राजकुमार जांभूळकर, नवनिता मेश्राम, संगीत साखरे, अजिंक्य उके यांनी केले. आभार कार्तीक रामटेके यांनी मानले. आनंद बुद्ध विहार अर्जुनी मोरगाव: ५९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विहारात बुद्ध वंदना व झेंडा वंदन करण्यात आले. यानिमित्त धम्मरॅली काढण्यात आली होती. शहरात काढण्यात आलेल्या रॅलीनंतर भोजनदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमासाठी युवराज जांभूळकर, संजय राऊत, गौतम शहारे, राजपाल गोस्वामी, धनंजय गोंडाणे, तूषार सांगोडे, अमित शहारे, सतीश टेंभूर्णे, सारंग शहारे, मनिश्वर सहारे, ममता सहारे, ज्योती शहारे, सुधा भैसारे, आम्रपाली जांभूळकर, रजनी शहारे, मेघराज जांभूळकर यांनी सहकार्य केले. याशिवाय बरडटोली येथील डॉ. आंबेडकर स्मारक समिती, त्रिरत्न बुद्ध विहार सिंगरटोली, समता कॉलोनी, आंबेडकर वॉर्डातही विविध कार्यक्रम घेण्यात आले. सारीपुत्त बुद्ध विहार, सावरटोला बाराभाटी : सावरटोला येथील सारीपुत्त बुद्ध विहार समितीच्यावतीने अयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपाल वैद्ये होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या मंगला गडकरी, दिलवर रामटेके, एम.आर.नंदावगळी, प्रा. कैलाश वैद्ये, भगवान मेश्राम, गुड्डेवार, सरपंच कोरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष मेंढे उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बौद्ध समाज सडक अर्जुनी : आंबेडकर वॉर्डातील पंचशील ध्वजाचे रोहण जनार्दन शहारे यांच्या हस्ते करण्यात आले. पटेल वॉर्डातील ध्वजारोहण कामुनाबाई राऊत यांनी केले. गणेश वॉर्डातील ध्वजारोहण रामलाल शहारे यांनी केले तर पूजन श्रद्धा रामटेके यांनी केले. मुख्य रस्त्यावरील आंबेडकर पुतळ््याला भाग्यवान शहारे यांनी माल्यार्पण केले तर पूजन ओमप्रकाश टेंभूर्णे यांच्या हस्ते करण्यात आले. संबोधी बुद्ध विहारचे ध्वजारोहण राजेश्वर चौधरी यांनी तर पूजन गोवर्धन खोब्रागडे यांनी केले. बुद्धवंदना परमानंद वैद्य यांनी केले. याप्रसंगी छन्नू साखरे, धनरूप उके, रेवाराम मेश्राम, परसराम सुर्यवंशी, बिरला गणवीर, जगदीश शहारे, गोपाल जनबंधू, राजेश्वर फुले, राजू बडोले व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. अनसूया पशिने हायस्कूल दासगाव : मुख्याध्यापिका व्ही.पी. बिसेन यांच्या अध्यक्षतेत कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी मिलिंद गजभिये यांनी, डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे उद्देश सांगितले. विद्यार्थ्यांनीही अपले विचार व्यक्त केले. पी.बी.चव्हाण व प्रा.देवेश उके यांनी गीत सादर केले. भिमवंदनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. संचालन शिवानी तुरकर हिने के. आभार मोसमी मेश्राम हिने मानले. रूंगाटोला (कडौतीटोला)चिचटोला:जिल्हा परिषद सदस्य लता दोनोडे यांच्या अध्यक्षतेत आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पंचायत समिती सभापती हिरालाल फाफनवाडे, सदसय दिलीप वाघमारे, डॉ. संजय देशमुख, सरपंच लक्ष्मी शहारे, मनोज अग्रवाल, संतोष अग्रवाल, भुमेश्वर मेंढे, पोलीस पाटील भिमराव साखरे, लविंद्र कोरे, रमेश शहारे उपस्थित होते. संचालन ग्राम सचिव सुरेश वाघमारे यांनी केले. कार्यक्रमासाठी संजय नंदेश्वर, राहुल नंदेश्वर, सचिन शहारे व गावकऱ्यांनी सहकार्य केले. गोठणगाव वॉर्ड क्रमांक ३ गोठणगाव : सरपंच शकुंतला वालदे यांच्या अध्यक्षतेत एओपी प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक जहार यांनी पंचशिल ध्वजारोहण केले. प्रमुख पाहुणे म्हणून एसआरपी ग्रुपचे चित्ते, डोंगरवार, टेंभुर्णे, भागरथा राणे, निर्मला इश्वार, रेखा चौबे व अन्य उपस्थित होते. संचालन दीपक राऊत व प्रवीण शहारे यांनी केले. आभार मंडळाचे अध्यक्ष विजय तिरपुडे व दिनदयाल रामटेके यांनी केले. कार्यक्रमासाठी शिवशंकर टेंभूर्णे, रायभान कऱ्हाडे, प्रमोद राऊत, मिलींद जांभूळकर, प्रवीण भोवते, हर्षद वालदे, माणिक रामटेके यांनी सहकार्य केले. ग्राम कढोली गोठणगाव: मोहन दानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष योगराज नंदेश्वर होते. याप्रसंगी तेजराम केराम, माधो कोडापे, भिमराव डोंगरवार, गोवर्धन लाडे, आशा नंदेश्वर, पुष्पा शहारे, शारदा शहारे उपस्थित होते. ग्राम रूंगाटोला (कडौतीटोला)बिजेपार : बौद्ध विहारात जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांच्या अध्यक्षतेत कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य लता दोनोडे, सभापती हिरालाल फाफनवाडे, पंचायत समिती सदस्य दिलीप वाघमारे, भुमेश्वर मेंढे, संतोष अग्रवाल, मनोज अग्रवाल, पोलीस पाटील भिमराव साखरे, केशोराव शहारे, कुसोबा बडोले, रमेश शहारे, डॉ. संजय देशमुख, चंद्रकला धमगाये व अन्य उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते मेणबत्ती लावून पंचशील ध्वज फडकाविण्यात आले. संचालन करून आभार ग्रामसेवक सुरेश वाघमारे यांनी मानले. महाप्रज्ञा बुद्ध विहार समिती व धम्म महोत्सव आयोजन समिती तिरोडा : महाप्रज्ञा बुद्ध विहार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून २४ तारखेला मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात १८ तारखेला विद्यार्थ्यांची वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यानंतर २४ तारखेला सताळी रांगोळी स्पर्धा व सांयकाळी ४ वाजता विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. तर सायंकाळी ७ वाजता किरण पाटणकर यांच्या गीत-गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येत भाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. ग्राम बोरकन्हार बोरकन्हार : जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांच्या अध्यक्षतेत आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डी.एस. मेश्राम, समाजसुधार पंचकमेटीचे अध्यक्ष उमराव शिंगाडे, बाबूलाल शहारे, वसंत मेश्राम, महेंद्र रामटेके, रंजीत शिंगाडे, एकनाथ खापर्डे, अनिल शहारे, हेमराज मेश्राम उपस्थित होते. याप्रसंगी पाहुण्यांनी डॉ. आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या जीवनावर माहिती दिली. संचालन मनोज मेश्राम यांनी केले. आभार संतोष रामटेके यांनी मानले. कार्यक्रमासाठी मुकेश रामटेके, सुधीर वाघमारे, राजेश चौधरी, निलेश चौधरी, रत्नदीप शिंगाडे, प्रमोद शिंगाडेसह अन्य नागरिकांनी यांनी सहकार्य केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)