शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातून गोंदिया जिल्ह्याला अव्वल बनविण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 22:08 IST

शासनाच्या यादीत गोंदिया जिल्हा मागासलेला व नक्षलग्रस्त आहे. या जिल्ह्याला विकासाच्या माध्यमातून राज्यातून अव्वल आणण्यासाठी आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्राच्या विकासाला गती दिली. शिक्षणासाठी शाळा-महाविद्यालये, आरोग्यासाठी आरोग्य केंद्र-उपकेंद्र व रस्त्यांचे जाळे तयार केले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : कटंगटोला येथे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: शासनाच्या यादीत गोंदिया जिल्हा मागासलेला व नक्षलग्रस्त आहे. या जिल्ह्याला विकासाच्या माध्यमातून राज्यातून अव्वल आणण्यासाठी आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्राच्या विकासाला गती दिली. शिक्षणासाठी शाळा-महाविद्यालये, आरोग्यासाठी आरोग्य केंद्र-उपकेंद्र व रस्त्यांचे जाळे तयार केले. तालुक्याला हेल्थ वेलनेस स्कीममध्ये समाविष्ट करून घेतले. त्यामुळे तालुक्यातील ५६ आरोग्य उपकेंद्रांमध्ये बीएएमएस डॉक्टर्सची नियुक्ती होईल व रूग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळेल, असे प्रतिपादन आ. गोपालदास अग्रवाल यांनी केले.कटंगटोला येथे ४० लाख रूपयांच्या निधीतून आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. या इमारतीचे लोकार्पण आ. अग्रवाल यांच्या हस्ते, जि.प. अध्यक्ष सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.आ. अग्रवाल म्हणाले, गोंदिया विधानसभा क्षेत्राचा सर्वांगिण विकास आमची भूमिका आहे. रस्त्यांच्या विकासासह आरोग्य विभागावर आमचे विशेष लक्ष आहे. समाजाच्या अंतिम घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचे ध्येय घेऊन आम्ही कार्य करीत आहोत. उत्तम आरोग्य सेवा प्रत्येक मानवाचा अधिकार असून ते उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे यांनीही मार्गदर्शन करून गोंदिया विधानसभा क्षेत्रात झालेल्या व होणाऱ्या विकास कार्यांचा उल्लेख केला.याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. आरोग्य सभापती रमेश अंबुले, महिला व बाल कल्याण सभापती लता दोनोडे, पं.स. सभापती विमला पटले, माजी पं.स. उपसभापती मनिष मेश्राम, माजी पं.स. सदस्य सत्यम बहेकार, जिल्हा काँग्रेस सचिव गेंदलाल शरणागत, पं.स. सदस्य सुनिता दोनोडे, टिकाराम भाजीपाले, कृउबासचे संचालक सावलराम महारवाडे, मनोज दहिकर, दिनेश अग्रवाल, महेंद्र गेडाम, सरपंच दुर्गा कावरे, उपसरपंच लक्ष्मीचंद मेश्राम, माजी सरपंच प्यारेलाल कावरे, वडेगावच्या सरपंच योगिता पाचे, जमील भाई, दुरूग बाहे, डॉ. जगदीश पारधी, हेमराज देशकर, लक्ष्मी पाचे व नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालHealthआरोग्य