शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची धडक; दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 21:13 IST

भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकल चालक जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी (दि.१६) दुपारी १२ वाजताच्या सुमारास गोंदिया-तिरोडा मार्गावरील मुंडीपार गावाजवळ घडली. रवी गुलाब राणे, रा.सेजगाव खुर्द असे अपघातात ठार झालेल्या मोटारसायकल चालकाचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकल चालक जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी (दि.१६) दुपारी १२ वाजताच्या सुमारास गोंदिया-तिरोडा मार्गावरील मुंडीपार गावाजवळ घडली. रवी गुलाब राणे, रा.सेजगाव खुर्द असे अपघातात ठार झालेल्या मोटारसायकल चालकाचे नाव आहे. घटनेनंतर चालकाने ट्रक सोडून पळ काढला.घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे व सरपंच नितिन टेंभरेसह अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.प्राप्त माहितीनुसार रवी हा आपल्या मोटारसायकल क्र.एम-एच-३१-एफ-डी ६७०८ ने पाहुण्यांना घेण्यासाठी मुंडीपार येथील बसस्थानाकडे जात होता. दरम्यान विरुध्द दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक क्र मांक सी-जे-०७-सी-ए-५३१४ ने त्याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात रवीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर ट्रक हा गोंदिया येथून धानाचे पोती घेऊन एमआयडीसीतील राईस मिलमध्ये जात होता. दरम्यान या अपघाताची माहिती परिसरातील गावकऱ्यांना होताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच घटनास्थळावर पोहचून ट्रक चालकाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रक चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. त्यामुळे घटनास्थळी गोळा झालेल्या गावकºयांनी ट्रकची तोडफोड करुन ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला. ट्रकला लावलेल्या आगीवर पोलिसांनी वेळीच नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी घटना टळली. गंगाझरी पोलिसांनी याप्रकरणी ट्रकचालकाविरु ध्द गुन्हा दाखल करु न चालकाचा शोध सुरु केला आहे.

टॅग्स :Accidentअपघात