शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

आदिवासी खरा पर्यावरण रक्षक

By admin | Updated: November 30, 2015 01:34 IST

या देशाचा आदिवासी समाज हा खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा रक्षक आहे. त्याने सतत जल, जंगल, ...

मान्यवरांचे मत : आदिवासी अधिकार दिवस व चर्चासत्रातील सूरसालेकसा : या देशाचा आदिवासी समाज हा खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा रक्षक आहे. त्याने सतत जल, जंगल, जमीन वाचवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहे. आज आदिवासी समाजाला जात वर्गामध्ये ठेऊन काहींना आदिवासी तर काहींना वनवासी, काहींना मूळनिवासी संबोधित करुन शासनकर्ते आदिवासी समाजाला कमजोर करण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु सकल आदिवासी समाजाच्या सर्व घटकांनी संघटीत होऊन शासनाच्या चुकीच्या निर्णयाचे ठामपणे विरोध करणे आवश्यक झाले आहे, असे प्रखर मत आदिवासी अधिकार दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.महामानव बिरसा मुंडा व शहीद बाबुराव शेळमाके यांची जयंती पुण्यतिथीचे औचित्य साधून येथे आदिवासी अधिकार दिवस साजरा करीत आदिवासी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.तहसील कार्यालयाच्या पटांगणात आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशनचे उपाध्यक्ष एन.डी. किरसान यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी संस्कृतीचे प्रचारक आनंद मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती देवराम वडगाये, माजी सभापती श्रावण राणा, पंचायत समिती सभापती हिरालाल फाफनवाडे, पिपल्स फेडरेशनचे सचिव दुर्गाप्रसाद कोकोडे, समाज कार्यकर्ता हिरालाल भोई, आदिवासी नेते शंकरलाल मडावी, जिल्हा परिषद सदस्य विशाखा टेकाम, माजी पंचायत समिती उपसभापती मनोज इळपाते, माजी जि.प. सदस्य रामेश्वर पंधरे, अशोक मसराम, सतिश पेंदाम, प्रेमकुमार गेडाम यांच्यासह आदिवासी समाजाचे अनेक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख वक्त्यांनी आपले विचार मांडताना म्हटले की जंगलांना वाचविण्यासाठी शासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या. वनाचे रक्षण करण्याच्या दृष्टीकोणातून गोठ्या प्रमाणात निधी खर्च होत गेला. परंतु याचे परिणाम नेहमी उलटे होत गेले. परिणामी जल, जंगल, जमिनीचा हाल होत गेले आणि पर्यावरणाची सुरक्षा धोक्यात आली. कारण की शासनाच्या प्रतिनिधींनी नैसर्गिक संपतीचा दुरुपयोग करु लागले. स्वार्थी भावनेतून बचत करु लागले त्यामुळे आज आदिवासींसह इतर समाजाला संकटाचा सामना करावा लागत आहे. पक्षी, प्राणी व जीवजंतूचे अस्तित्व सुद्धा धोक्यात आले आहे. आदिवासी समाजाने निसर्ग प्रदत्त पाचही तत्वांना देवी देवतांचे स्वरुप मानून त्याचे रक्षण करण्याचा सतत प्रयत्न केला. त्यामुळे जल, जंगल, जमीनला शासनाने आदिवासींच्या स्वाधीन करायला पाहिजे तेव्हाच पर्यावरणाचे रक्षण करणे शक्य होईल असे प्रखर विचार यावेळी आदिवासी समाजातील मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांनी बिरसा मुंडा, बाबुराव शेडमाके, राणी दुर्गावती, मोतीरावण कंगाले आदी पूजनीय व्यक्तींच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविक मेघराज घरत यांनी मांडले. संचालन राधेश्याम टेकाम यांनी केले. तर आभार आर.एम. भोयर यांनी मानले.कार्यक्रमासाठी मनोहर उईके, मुलचंद गावराणे, वासुदेव घरत, एन.एम. हरदुले, ए.टी. सोयाम, मनिष पुसाम, मीरा नाईक, पूजा वरसुडे, संगीता कुसराम, माधुरी घरत, अर्चना राऊत, सतवंती मडावी, जगदीश मडावी, पूनाम मडावी, सुनंदा उके, सिंधू भलावी यांच्यासह सर्व आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)