शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 22:21 IST

तालुक्यात सुरू असलेल्या रेती चोरीकडे महसूल विभागाचे लक्ष नसल्याच्या बातम्या वारंवार प्रकाशित होत होत्या. त्याची दखल घेत महसूल विभाग खळबळून जागा झाला असून सोमवारी (दि.६) दोन तर मंगळवारी (दि.७) दोन अशाप्रकारे एकूण चार ट्रॅक्टर पकडण्यात आले आहेत.

ठळक मुद्देचार ट्रॅक्टरवर कारवाई : महसूल व पोलीस विभागाने केले वाहन जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : तालुक्यात सुरू असलेल्या रेती चोरीकडे महसूल विभागाचे लक्ष नसल्याच्या बातम्या वारंवार प्रकाशित होत होत्या. त्याची दखल घेत महसूल विभाग खळबळून जागा झाला असून सोमवारी (दि.६) दोन तर मंगळवारी (दि.७) दोन अशाप्रकारे एकूण चार ट्रॅक्टर पकडण्यात आले आहेत.सोमवारी पहाटे ६ वाजता चुलबंद नदीच्या पात्रातून अवैध रित्या रेती चोरी करून वाहतूक करीत असताना तहसीलदार उषा चौधरी यांच्या मार्गदर्शनात महसूल विभागाच्या पथकाने चुलबंद नदीच्या कोदामेडी गावाजवळील घोगरा घाट परिसरात कारवाई केली. यात वाहन क्र मांक ङ्क्त एमएच ३५- जी ९०७६ तसेच एक विना क्रमांकाचा ट्रॅक्टर पकडला. चालकांकडे वाहतूक परवाना आढळून न आल्याने वाहन जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. त्यांच्यावर महाराष्ट्र अधिनियम १९६६ कलम ४८ (७) व महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक १२ जानेवारी २०१८ अन्वये एक लाख १५ हजार ४०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.त्याचप्रकारे मंगळवारी (दि.७) पहाटे ६.३० वाजतादरम्यान हरेश लांजेवार वय (२६, रा.पळसगाव-राका) व कांतमन बैज कुरसुंगे (२९.रा. बानटोला-चिखली) यांना पळसगाव-राका मार्गावर अवैध रित्या बिना क्रमाकाच्या ट्रॅक्टरमध्ये रेतीची वाहतूक करताना पोलिसांनी पकडले. दोन्ही ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले असून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. सध्या महाराष्ट्रातील संपूर्ण रेतीघाटांच्या लिलावावर स्थगिती आली आहे. मात्र तालुक्यातून रात्रीला अवाधरित्या रेती चोरी केली जात असल्याचे बोलले जात आहे. रेती चोरी मुळे जवळील उमरझरी नाल्याचे आता गटार झाल्याचे दिसत आहे. रेती माफियांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रेमी करीत आहेत.रेती साठवून जादा दरात विक्रीतालुक्यातील ग्राम सावंगी, कोडमेडी , वडेगाव, रेंगेपार, डोंगरगाव डेपो, सौंदड, फुटाळा, कोहमारा, पीपरी, चिखली, बोथली, म्हसवाणी, घोटी, तिडका आदी ठिकाणी अवैधरित्या रेती साठवून ठेवल्याचे दिसत आहे. त्यामुळे साठवून ठेवलेली रेती कुणाची असा प्रश्न जनतेला पडतो. या साठवून ठेवलेल्या रेतीचा लिलाव करण्याची नितांत गरज आहे. रात्री जेसीबीच्या माध्यमातून ट्रकमध्ये भरून देवरी, साकोली, गोंदिया, गोरेगाव, नवेगावबांध अशा मोठ्या शहरात चांगल्या किमतीत ही रेती विकली जाते. अशात महसूल विभागाकडून काय कारवाई होते. याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :sandवाळूPoliceपोलिस