शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून केला शाळेचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:18 IST

संघटन शक्तीपुढे काहीच अशक्य नाही याचे मूर्त उदाहरण तालुक्यातील ग्राम हिरडामाली येथे बघावयास मिळत आहे. लोकसहभागातून येथील प्राथमिक शाळेचा कायापालट करण्यात आला असून प्राथमिक विभागातील आंतरराष्ट्रीय दर्जाची ही पहिली प्राथमिक शाळा ठरली आहे.

ठळक मुद्देहिरडामाली येथील शाळा : आंतरराष्ट्रीय दर्जाची पहिली प्राथमिक शाळा

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : संघटन शक्तीपुढे काहीच अशक्य नाही याचे मूर्त उदाहरण तालुक्यातील ग्राम हिरडामाली येथे बघावयास मिळत आहे. लोकसहभागातून येथील प्राथमिक शाळेचा कायापालट करण्यात आला असून प्राथमिक विभागातील आंतरराष्ट्रीय दर्जाची ही पहिली प्राथमिक शाळा ठरली आहे.या शाळेतील मुख्याध्यापक ते शिक्षकांनी अथक परिश्रमातून या शाळेत शैक्षणिक वातावरण निर्मिती केली आहे. शालेय परिसरातील सुसज्ज इमारत, आवारातील शंभर टक्के बोलक्या भिंती, स्मार्ट वर्ग, डिजीटल वर्ग, ज्ञान रचनावादी शिक्षण, कृतीयुक्त उपक्रम, शालेय परिसरातील चित्रीकरण या शाळेच्या जमेच्या बाजू असून म्हणूनच शाळेला प्राथमिक विभागातून जिल्ह्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा मिळवून दिला. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय मंडळाशी सलग्नित होणारी जिल्ह्यातील दुसरी तर उच्च प्राथमिक गटातून पहिली शाळा हा या शाळेने मिळविलेला मान, अधोरेखीत करण्यासारखा आहे.हिरडामाली हे गाव तसे साऱ्या महाराष्ट्रात नावाजलेले गाव. राजकारणात अखंड नाव कमावलेले हे गाव. शैक्षणिक क्षेत्रातही मोठी भरारी मारु शकेल असे कधी कुणाला वाटले नसावे. पण येथील तत्कालीन आणि कार्यरत शिक्षकांनी जी काही मेहनत घेतली त्याचे फळ आता या गावाला मिळणार आहे.जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा शंभर टक्के डिजीटल आहे. शाळेत लोकसहभागातून २३ टॅब, १२ संगणक, ५ प्रोजेक्टर, ३ एलईडीची व्यवस्था करण्यात आली आहे. १ ते ७ वर्ग पर्यंतचे १९९ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. सर्वच विद्यार्थी डिजीटल शिक्षण प्रणालीचा फायदा घेत पटापट टॅबवर हात फिरवून उत्तरे देतात. या शाळेने ‘गावची शाळा-आमची शाळा’ उपक्रमात दोनदा तालुक्यातून प्रथम क्रमांक तर एकदा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविला.गुणवत्ता पूर्ण शाळा उपक्रमात जिल्ह्यातून द्वितीय तर तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला. साने गुरुजी स्वच्छ शाळा उपक्रमात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर अलीकडेच गुणवत्त पूर्ण शाळा उपक्रमात जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचा मान या शाळेला प्राप्त झाला.या शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक वाय.एस. भगत, तत्कालीन शिक्षक राहुल कळंबे, मुख्याध्यापक एस.डी. चन्ने, शिक्षक विरेंद्रकुमार पटले, एस. आर. बघेले, एन.आर. बिसेन, ए.ई. चाकाटे, सी.आर. पारधी, पी.सी. नंदेश्वर, एस.सी. पारधी, शाळा व्यवस्थापन समिती प्रा. लोकेश कटरे, गावकरी व पालकांच्या अथक आणि अखंड प्रयत्नांमुळे या शाळेचा कायापालट झाला आहे.विद्यार्थ्यांची बचत बँकया शाळेने बचत बँक उपक्रम सन २०१६ पासून राबविण्याचे काम हाती घेतले आहे. मुलांना बचतीचे फायदे सांगून बचतीचे धडे दिले. लहान बचत भविष्यात कशी फायद्याची आहे, हा मुलमंत्र मुलांनी जपला. आजघडीला या शालेय बचत बँकेत मुलांनी ८० हजार रुपये बचत केल्याचे तेथील शिक्षकांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Schoolशाळा