देवरी : मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर ट्रेलरने रस्ता दुभाजक तोडून ट्रकला टक्कर देवून विद्युत खांबावर जाऊन धडकला. या अपघातामुळे मंगळवारला सर्व्हिस रोड पूर्णपणे बाधित झाला होता.रायपूरकडून नागपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेलरने धनवर्षा बँकेसमोरील राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. यावेळी महामार्गाच्या कडेला असलेले बॅरीगेट्स तोडून रस्ताच्या बाहेर असलेल्या विद्युत खांबावर तो ट्रेलर जावून आदळला. गर्दीच्या ठिकाणावरील रस्त्यावर ट्रेलर आडवा झाल्याने वाहतुक व्यवस्था दिवसभर खोळंबून होती.(प्रतिनिधी)
रस्ता दुभाजक तोडून ट्रेलरची ट्रकला धडक
By admin | Updated: March 30, 2016 02:13 IST