लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रस्त्यावर सामान लावून अतिक्रमण करणाऱ्या येथील फुटपाथ दुकानदारांना वाहतूक नियंत्रण शाखेने मंगळवारी (दि.१५) दणका दिला. यातील दुकानदारांचे रस्त्यावरील अतिक्रमण हटवून सहा दुकानदारांचे सामान वाहतूक नियंत्रण शाखेने जप्त करून कारवाई केली.नेहरू चौकातून पुढे बाजाराकडे जाणारा रस्ता मुख्य रस्ता असून येथे सतत वाहनांची वर्दळ असते. असे असतानाही इंदिरा गांधी स्टेडियमसमोरील फुटपाथ दुकानदार आपल्या दुकानातील सामान व कपडे रस्त्यावर लावतात.यामुळे रस्ता अरूंद होत असून वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. या दुकानदारांचे अतिक्रमण काढण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेकडून सातत्याने मोहिम राबवून अतिक्रमण हटविले जाते. मात्र काही दिवसांत पुन्हा तीच स्थिती निर्माण होत असून येथील दुकानदार काही सुधारत नसल्याचे चित्र आहे. रस्त्यावर सामान लावून अतिक्रमण करण्याचा त्यांचा हा प्रकार सुरूच आहे. ही बाब लक्षात घेत वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक संजय सिंग यांनी मंगळवारी (दि.१५) फुटपाथ दुकानदारांचे अतिक्रमण काढण्यासाठी मोहिम राबविली. यात त्यांनी आपल्या सहकाºयांसह फुटपाथ दुकानदारांचे रस्त्यावर आलेले सामान काढले. तसेच सहा दुकानदारांचे रस्त्यावर असलेले कपडेही जप्त करून कारवाई केली. त्यांच्या या कारवाईमुळे फुटपाथ दुकानदारांना रस्त्यावरील सामान आत घेतले. मात्र आता किती दिवस यात सातत्य राहते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.दुकानदारांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होते.त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. यापुढे ही कारवाई सुरू राहिल.- संजय सिंगनिरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, गोंदिया
फुटपाथ दुकानदारांना वाहतूक विभागाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:46 IST
रस्त्यावर सामान लावून अतिक्रमण करणाऱ्या येथील फुटपाथ दुकानदारांना वाहतूक नियंत्रण शाखेने मंगळवारी (दि.१५) दणका दिला. यातील दुकानदारांचे रस्त्यावरील अतिक्रमण हटवून सहा दुकानदारांचे सामान वाहतूक नियंत्रण शाखेने जप्त करून कारवाई केली.
फुटपाथ दुकानदारांना वाहतूक विभागाचा दणका
ठळक मुद्देदुकानदारांचे अतिक्रमण हटविले : सहा दुकानदारांचे सामान जप्त, मोहीम राबविणार