शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

पुजारीटोला धरण परिसरात पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:00 IST

कोरोनामुळे यंदा मागील पाच महिन्यांपासून सर्वच पर्यटन स्थळी शुकशुकाट आहे. तरी नागरिकांना सुध्दा अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडता येत नाही. मात्र आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. यंदा जून, जुलै महिन्यात पाऊस न झाल्याने हाजराफॉल, नवेगावबांध, पुजारीटोला, सिरपूरबांध या पर्यटनस्थळ परिसरात शुकशुकाट होता.

ठळक मुद्देनियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष : सुरक्षा विषयक उपाययोजनांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : जिल्ह्यात मागील तीन चार दिवस झालेल्या दमदार पावसामुळे नदी, नाले, सिंचन प्रकल्प तुडूंब भरले आहेत. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरण देखील भरले असून या धरणाचे ६ दरवाजे सोमवारी (दि.२४) उघडण्यात आले. त्यामुळे हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी धरणाच्या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी होत आहे. मात्र त्यांच्याकडून नियमांचे पालन केले जात नसल्याने या ठिकाणी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोरोनामुळे यंदा मागील पाच महिन्यांपासून सर्वच पर्यटन स्थळी शुकशुकाट आहे. तरी नागरिकांना सुध्दा अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडता येत नाही. मात्र आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. यंदा जून, जुलै महिन्यात पाऊस न झाल्याने हाजराफॉल, नवेगावबांध, पुजारीटोला, सिरपूरबांध या पर्यटनस्थळ परिसरात शुकशुकाट होता. मात्र जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपूर्वी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे हाजराफॉल व पुजारीटोला परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे.सध्या कोरोनाचा संक्रमण सुरू असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी बाळगण्याची गरज आहे. पण पर्यटकांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आदी गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात आहे. पर्यटक बिनधास्तपणे धरणातील पाण्यात जावून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण संबंधित विभागाचे सुध्दा या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष झाले आहे.धरण स्थळी सुरक्षा व्यवस्थेचा अभावपुजारीटोला येथील धरणस्थळी मागील दोन तीन दिवसांपासून पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पर्यटक नियमांचे पालन न करता धरणातील पाण्यात जावून जीव धोक्यात घालून सेल्फी घेत आहे. मात्र येथील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त व सुरक्षा रक्षकांची सुध्दा नियुक्ती सिंचन विभागाने केलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघात घडल्यास या जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.सेल्फी घेणे बेतू शकते जीवावरपुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे या धरणाचे सहा दरवाजे सोमवारी उघडण्यात आले. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी करीत आहेत. तर काही अतिउत्साही पर्यटकांना आपला मोह आवरत नसून ते धरणाच्या पाण्यात जावून सेल्फी घेत आहेत.त्यामुळे हा प्रकार धोकादायक असून यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :dam tourismधरण पर्यटन