शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

दुर्ग इतवारी लोकलमधील शौचालय कुलूप बंद ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:21 IST

आमगाव : दुर्ग-इतवारी या लोकल गाडीतील महिला प्रवाशांच्या डब्यातील शौचालयाला कुलूप लावण्यात आले होते. यामुळे महिला प्रवाशांची कुचंबणा होत ...

आमगाव : दुर्ग-इतवारी या लोकल गाडीतील महिला प्रवाशांच्या डब्यातील शौचालयाला कुलूप लावण्यात आले होते. यामुळे महिला प्रवाशांची कुचंबणा होत होती. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्यांनी याची माहिती ट्वीट करून रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना दिली. त्यानंतर रेल्वे प्रशासन खळबळून जागे झाले व लावलेले कुलूप उघडण्याचे आदेश दिले.

प्राप्त माहितीनुसार १ जून रोजी दुर्ग-गोंदिया इतवारी प्रवासी रेल्वे गाडी सुरू झाली. या गाडीत महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात महिला बसल्या. काही अंतरावर गाडी गेल्यानंतर महिला प्रवासी शौचालयाकडे गेल्या असता शौचालयाच्या दरवाज्याला कुलूप लागले होते. त्यामुळे महिला प्रवाशांची अडचण झाली. रेल्वेत प्रवास करताना महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. रेल्वे प्रशासनाने लोकल गाड्यांमध्ये प्रवाशांना शौचालयाची सेवा उपलब्ध करून दिली. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली; परंतु लोकल गाडीतील शौचालयाला रेल्वे प्रशासनाने कुलूप लावल्याने अनेक प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेक महिलांनी याबद्दल रोष व्यक्त करीत आपली व्यथा सांगितली. याची दखल घेत आमगाव येथील यशवंत मानकर या सामाजिक कार्यकर्त्याने दुर्ग-गोंदिया-इतवारी गाडीतील कुलूप बंद शौचालयाचा फोटो काढून तो रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना ट्वीट केला. तसेच या सर्व प्रकाराची तक्रार करून कारवाईची मागणी केली. त्याचीच त्वरित दखल घेत रेल्वे विभागाने तक्रारकर्त्या सामाजिक कार्यकर्त्यांशी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच ट्विटरवर सुद्धा कारवाई केली जाईल, असे उत्तर दिले. तसेच शौचालयाला लावलेले कुलूप उघडण्याचे निर्देश संबंधितांना दिले.