शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आज निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावणार; जाहीर प्रचार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 15:02 IST

Gondia : आता प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर, नेते व उमेदवारांचे बंदव्दार मंथन झाले सुरु

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या १३ दिवसांपासून सुरू असणारी रणधुमाळी आता सरण्याच्या मार्गावर आहे. २० नोव्हेंबरला मतदान होणार असल्याने त्याच्या ४८ तासांपूर्वी म्हणजे सोमवारी (दि. १८) सायंकाळी ६ वाजता प्रचारतोफा थंडावणार आहे. यामुळे गेल्या १३ दिवसांपासून चारही मतदारसंघांत सकाळपासून ऐकू येणारे गाणे व भोंग्यांचा आवाज बंद पडणार आहे.

जाहीर प्रचार बंद होत असल्याने आता सर्वच उमेदवार व प्रमुख पक्षांचा मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर असणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया ४ नोव्हेंबरला पार पडल्यानंतर चित्र स्पष्ट होऊन जिल्ह्यातील गोंदिया, अर्जुनी मोरगाव, तिरोडा व आमगाव या चारही मतदारसंघांत ५ नोव्हेंबरपासून जाहीर प्रचाराला सुरुवात झाली होती. 

सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी गेल्या १३ दिवसांत पक्षाच्या दिग्गज नेत्यांचा प्रचारसभा घेऊन मतदारांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मन वळविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला. निवडणूक प्रचारामुळे सकाळपासूनच गाणी आणि लक्ष असू द्याचे भोंगे वाजत होते. हे चित्र जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत कायम होते. पण, सोमवारी सायंकाळी ६ वाजतानंतर जाहीर प्रचार करता येणार नसल्याने आता प्रचाराचे भोंगे शांत होणार आहे, निवडणूक रिंगणातील ६४ उमेदवार आणि त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भर थेट मतदारांच्या गाठीभेटीवर असणार आहे. 

व्हाइस कॉलवरून मतांचा जोगवाकमी कालावधीत अधिक मतदारांपर्यंत पोहचता यावे, यासाठी सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत व्हॉइस कॉलवरून मतदारांना मतांचा जोगवा मागण्यास सुरुवात केली आहे. रविवारी सायंकाळपासूनच उमेद- वारांच्या व्हाइस कॉलने मतदारांचे मोबाइल खणखणले. 

प्रचाराचा सुपर मंडे आज, शक्तिप्रदर्शनाचे नियोजन सोमवारी सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार बंद होणार आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी पदयात्रा, रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करून मतदारांवर अखेरची छाप पाहण्याचे नियोजन केले आहे. महाविकास व महायुतीच्या उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात बाइक रॅलीचे आयोजन केले आहे, तर तिरोडा आणि सडक अर्जुनी येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रचारसभा होणार आहे. 

आता मतांचे समीकरण जुळविण्यावर भर२० नोव्हेंबरला चारही मतदारसंघांत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार हे दोन्ही दिवस महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे या दोन दिवसांत मतदारांचे मतपरिवर्तन करून त्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी विविध फंडे वापरून समीकरण जुळविण्यावर प्रमुख उमेदवार आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा भर असणार आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया