शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

जिल्ह्यात आज ३६९ दुर्गामूर्तीचे विसर्जन

By admin | Updated: October 11, 2016 00:38 IST

गणपती उत्सवासारखेच किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रमाणात ्रगोंदिया जिल्ह्यात दुर्गा उत्सव साजरा केला

उत्सवाची १३ ला होणार सांगता : जिल्हाभरात ५४७ दुर्गा मंडळांनी केली होती स्थापना गोंदिया : गणपती उत्सवासारखेच किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रमाणात ्रगोंदिया जिल्ह्यात दुर्गा उत्सव साजरा केला जातो. गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या या उत्सवाची सांगता करीत घट आणि दुर्गामूर्तींचे विसर्जन सुरू झाले आहे. मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी सर्वाधिक ३६९ मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणाच्या सार्वजनिक मंडळांनी ५४७ दुर्गामूर्तीची स्थापना केली होती. रविवार ९ आॅक्टोबरच्या रात्रीपासून दुर्गामूर्तींच्या विसर्जनाला सुरूवात झाली. त्यात ६ मूर्तीचे विसर्जन रविवारी, १०१ मूर्तीचे सोमवारी तर मंगळवारी (दि. ११) सर्वाधिक ३६९ मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. त्यात गोंदिया शहर ३६, रामनगर २०, गोंदिया ग्रामीण ३६, रावणवाडी ४०, तिरोडा १६, गंगाझरी ३१, दवनीवाडा २६, आमगाव ४६, गोरेगाव ३२, सालेकसा ४९, देवरी ४, चिचगड ५, डुग्गीपार १४, अर्जुनी-मोरगाव १०, नवेगावबांध १, केशोरी ३ ठिकाणी दुर्गा विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. १२ आॅक्टोबर रोजी गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत १, रामनगर १, गोंदिया ग्रामीण ४, रावणवाडी ८, गंगाझरी ८, दवनीवाडा ८, आमगाव ३, गोरेगाव ३, सालेकसा ७, देवरी ४, चिचगड २, डुग्गीपार २, अर्जुनी-मोरगाव ११, नवेगावबांध १ तर केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत ३ मूर्तींचे विसर्जन होणार आहे. याशिवाय १३ आॅक्टोबर रोजी रावणवाडी २, तिरोडा १, दवनीवाडा १, डुग्गीपार १, अशा पाच मृर्ती विसर्जन करण्यात येणार आहेत. शारदा मूर्ती १७ आॅक्टोबरपर्यंत विसर्जित होणार आहेत. (तालुका प्रतिनिधी) ६२ ठिकाणी रावणदहन ४मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी जिल्ह्यात ६२ ठिकाणी रावणदहन करण्यात येणार आहे. त्यात गोंदिया शहर ३, रामनगर १, गोंदिया ग्रामीण २, रावणवाडी ७, तिरोडा २, गंगाझरी ३, दवनीवाडा निरंक, आमगाव १, गोरेगाव ४, सालेकसा २, देवरी २, चिचगड ८, डुग्गीपार १६, अर्जुनी-मोरगाव ७, नवेगावबांध १ तर केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत ३ ठिकाणी रावनदहन करण्यात येणार आहे. ८८ ठिकाणी आज धम्मचक्र प्रवर्तन दिन ४ डॉ.बाबासाहेबांनी नागपूरच्या ऐतिहासिक भूमिवर दिलेल्या धम्मदीक्षा सोहळ्याची आठवण म्हणून दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी जिल्ह्यात अनेक ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम साजरा केला जातो. यावर्षी ८८ ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. ४ गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ ठिकाणी, गोंदिया ग्रामीण १०, रावणवाडी ४, तिरोडा ६, गंगाझरी ७, दवनीवाडा ६, आमगाव १, गोरेगाव ८, सालेकसा ६, देवरी ७, चिचगड ४, डुग्गीपार ९, अर्जुनी-मोरगाव १० तर केशोरी ठाण्यांतर्गत ७ ठिकाणी हे कार्यक्रम आयोजत केले आहेत. अशी केली सुरक्षा व्यवस्था ४दुर्गा विसर्जन करण्याची ठराविक वेळ नसल्याने किंवा रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात विसर्जन करण्यात येत असल्यामुळे विसर्जनस्थळी पाण्यामुळे कोणताही अपघात होऊ नये यासाठी कठडे लावण्यात आले आहेत. सोबतच प्रत्येक मंडळांकडून विसर्जनाची संभावित वेळ घेऊन त्यावेळी बंदोबस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. रात्रीची वेळ असल्याने लाईटची व्यवस्थाही करण्यात आली आहे. खोल पाण्यात जाऊ नका, अश्या सूचनाही मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. गोंदिया शहरातील दुर्गा महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील बाघ नदीच्या कोरणी घाटावर विसर्जनासाठी जात असल्याने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. निर्माल्य दानातूृन टाळली पर्यावरणाची हानी ४पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी दुर्गा उत्सवादरम्यान भाविकांनी वाहिलेले पुजेचे साहित्य, फूल मूर्तीसोबत पाण्यात विसर्जित केल्यास तेथील पाणी प्रदुषित होते. पर्यायाने पर्यावरणाची हाणी होते. हे टाळण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग, वनविभागाच्या वतीने सोमवारी निर्माल्य रथ फिरविण्यात आला. यासाठी लागवड अधिकारी युवराज कुंभलकर, नर्मदा सेवा संस्थेचे माधव गारसे, स्वामी विवेकानंद हायस्कूल कारंजाच्या राष्ट्रीय हरित सेनेचे प्रभारी शिक्षक बिसेन आदींनी पुढाकार घेतला. निर्माल्य रथ शहरात विविध ठिकाणी फिरवून निर्माल्य गोळा करण्यात आले. ते सामाजिक वनीकरण विभागाच्या तिरोडा मार्गावरील रोपवाटिकेच्या जागेत टाकण्यात आले.