शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

आज २० कोटी पुस्तकांचे वाचन

By admin | Updated: October 15, 2016 00:19 IST

गोंदिया जिल्ह्याने वाचन आनंद दिवस ८ सप्टेंबर २०१६ रोजी राबविला. त्या दिवशी ३१ लाख पुस्तकांचे वाचन

नरेश रहिलेल्ल गोंदिया गोंदिया जिल्ह्याने वाचन आनंद दिवस ८ सप्टेंबर २०१६ रोजी राबविला. त्या दिवशी ३१ लाख पुस्तकांचे वाचन करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने १ आॅक्टोबर २०१६ च्या शासन परिपत्रकात गोंदिया जिल्ह्याने केलेल्या कार्य पद्धतीचा उल्लेख करीत राज्यात १५ आॅक्टोबर ला गोंदिया पॅटर्न राबविण्यात येणार असल्याचे सूचविले. राज्यातील विद्यार्थी उद्या शनिवारी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करीत असून एकाच दिवशी २० कोटी पुस्तकाचे वाचन करणार आहेत. गोंदिया जिल्ह्याने विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागावी यासाठी वाचन प्रेरणा दिवसाची पुर्वतयारी म्हणून ८ सप्टेंबर २०१६ रोजी वाचन आनंद दिवस साजरा केला. या दिवशी जिल्ह्यातील ३१ लाख पुस्तकांचे वाचन करण्यात आले. १ आॅक्टोबर २०१६ च्या शासन परिपत्रकात गोंदिया जिल्ह्याने केलेल्या कार्य पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे. या वाचन प्रेगणा दिवसाचे औचित्य साधून राज्यात वर्ग-१ व वर्ग-२ चे अधिकाऱ्यांच्या शाळा भेटी, सदर दिवस दप्तरमुक्त व हातधूवा दिवस सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दूल कलाम यांच्या स्मृतीदिनी १५ आॅक्टोबर हा दिवस राज्यात वाचन प्रेरणा दिवस ाागावी म्हणून साजरा करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. या दिवशी प्रत्येक विद्यार्थी कमीत कमी १० लहान मोठ्या पुस्तकांचे वाचन करणार आहे. काही शाळांमध्ये टॅब व संगणकाद्वारे आॅनलाईन पद्धतीने अधिकृत पुस्तक अ‍ॅप्स उपलब्ध करुन पुस्तकांचे वाचन करण्यात येणार आहे. जेथे पुस्तके कमी जाण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी सार्वजनिक ग्रंथालय, शिक्षणप्रेमी, युवक मंडळे, शिक्षक यांच्या माध्यमातून पुस्तके उपलब्ध करुन देण्यात येईल. गोंदिया जिल्ह्याने वाचन आनंद दिवशी केलेल्या सर्व कार्यपद्धतीचा उल्लेख शासनाने काढलेल्या १ आॅक्टोबर २०१६ च्या परिपत्रकात करीत राज्यात १५ आॅक्टोबर ला गोंदिया पॅटर्न राबविण्याच्या सूचना केल्या. यशस्वी अंमलबजावणी व्हावी याकरिता शिक्षण विभागाने केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना नियोजनाप्रमाणे कार्यवाही करण्यास सूचविले आहे. शहर गाव पातळीवर मोक्याच्या ठिकाणी बॅनर, होर्डिग्सद्वारे प्रचार करण्यात येत आहे. सदर दिवशी विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक, गावकरी, पालक, युवक मंडळे व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य हे सुद्धा वाचनाचा आनंद घेणार आहेत. - उपक्रमावर एक दृष्टिक्षेप ४जिल्ह्यामध्ये वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाची आखणी, अंमलबजावणी व सनियंत्रण आपल्या स्तरावरुन करण्यात यावे. ४सर्व शाळांना पुरेशी पुस्तके उपलब्ध. ४स्वयंसेवी संस्था, प्रसारमाध्यमे यांच्याशी समन्वय साधावा. ४जिल्ह्यातील सर्व विभागांच्या गट अ, गट ब व गट क अधिकाऱ्यांचा सहभाग राहील. किमान ५ शाळांना एका अधिकाऱ्यांच्या भेटी. ४ जिल्ह्याचा अहवाल शासनास सादर करा. ४विद्या प्राधिकरण, पुणे यांचेकडून द्विभाषिक पुस्तकांची शिफारस केलेली यादीतील पुस्तके शाळांनी खरेदी करावीत. ४प्रत्येक प्रत्येक मुलामागे १० पुस्तके याप्रमाणे पुस्तके उपलब्ध होतील. ४बोलीभाषेची पुस्तके आवश्यकतेनुसार उपलब्ध आहेत. ४पुस्तक दिंडीचे आयोजन करण्यात यावे. नागरिक, पालक, शिक्षणप्रेमी, माजी विद्यार्थी, समाजाकडून पुस्तके देणगी घ्यावीत. ४संगणक, टॅबलेट आॅनलाईन पद्धतीने मोफत अधिकृत पुस्तके अ‍ॅप्सद्वारे उपलब्ध करुन प्रोजेक्टद्वारे मुलांना वाचनासाठी उपलब्ध होतील. ४ वाचनासाठी शाळेत योग्य पद्धतीने वातावरण निर्मिती करावी. ४वाचन प्रेरणा दिवस दप्तरमुक्त दिवस म्हणून जाहीर. ४दहा पुस्तके वाचण्याचे दडपण अथवा भिती मुलांना वाटणार नाही अशा पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले. ४मुलांना वाचन करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता बोलवावे. तथापि कोणतेही उद्घाटन सभारंभ, भाषणे करु नयेत, मुलांच्या पुस्तक वाचनावरच भर द्यावा. ४वाचन प्रेरणा दिवशी कोणतेही धार्मिक ग्रंथ, त्यावर आधारित मूल्य शिक्षणाची पुस्तके, विवादित पुस्तके, भितीदायक, आक्षेपार्ह मजकूर इत्यादी प्रकारची पुस्तके मुलांना वाचनासाठी देऊ नये. दुपार पाळीत शाळा ४ १५ आॅक्टोबर ला शनिवार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा ह्या दुपार पाळीत (सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजता) या कालावधीत सुरु ठेवण्यात आल्या आहेत. या दिवशी वाचन प्रेरणा दिवसा बरोबर हातधुवा दिवस सुद्धा साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व अधिकारी शाळांना भेटी देणार आहेत.