शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

टिकारामटोल्यातील घरांना जबरदस्तीने उठवणार नाही

By admin | Updated: August 3, 2014 23:26 IST

तिरोडा येथील अदानी वीज प्रकल्पासाठी जमीन देण्यास विरोध करणाऱ्या टिकारामटोला येथील रहिवाशांना जबरदस्तीने आणि नियमबाह्यपणे उठविले जाणार नाही. त्यांच्या बाबतीमधील सर्व कार्यवाही

एसडीओ महिरे : प्रकल्पग्रस्तांना वेळ देणारगोंदिया : तिरोडा येथील अदानी वीज प्रकल्पासाठी जमीन देण्यास विरोध करणाऱ्या टिकारामटोला येथील रहिवाशांना जबरदस्तीने आणि नियमबाह्यपणे उठविले जाणार नाही. त्यांच्या बाबतीमधील सर्व कार्यवाही नियमानुसारच होईल, अशी भूमिका तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांना काही दिवसांकरिता दिलासा मिळाला आहे.अदानी विद्युत प्रकल्पासाठी लाागणाऱ्या भूमिगत रेल्वे लाईनच्या कामासाठी परिसरातील काही गावे उठवून त्यांचे पुनर्वसन केले जात आहे. त्यात टिकारामटोला येथील पाच घरमालकांनी अपेक्षित मोबदला न मिळाल्यामुळे तेथून हटण्यास नकार दिला आहे. गुरूवारी (दि.३१) तिरोडा एसडीओंकडे झालेल्या सुनावणीत त्यांनी गावातून हटण्यास तयार नसल्याचे एसडीओंना स्पष्टपणे सांगितले.वास्तविक शासनाच्या पुनर्वसन धोरणानुसार प्रकल्पबाधित गावकऱ्यांना त्यांची इच्छा नसतानाही हटविता येत असले तरी त्यासाठी सुनावणीनंतर ४५ दिवसांचा अवधी द्यावा लागतो. या कालावधीत बाधित प्रकल्पग्रस्त नागरिक वरिष्ठांकडे याबाबत अपिलही करू शकतात. परंतू त्यांना तो कालावधी न देताच त्यांच्या घरांवर बुलडोजर चालविण्यासाठी दबाव आणला जात असल्यामुळे त्या नागरिकांमध्ये असंतोष आणि दहशतीची भावना पसरली आहे. यातील एका नागरिकाने आत्मदहनाचा सुद्धा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. (जिल्हा प्रतिनिधी)