शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
7
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
8
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
9
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
10
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
11
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
12
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
13
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
14
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
15
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
16
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
17
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
18
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
19
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
20
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू

तीन दिवसांपासून रूग्णांसह कर्मचारी तहानलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 9:05 PM

विविध कारणांवरुन नेहमीच चर्चेच राहणारे येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून पाणीच मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देगंगाबाई रूग्णालयातील प्रकार : बोअरवेलला लावलेली मोटार जळाली

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विविध कारणांवरुन नेहमीच चर्चेच राहणारे येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून पाणीच मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालय प्रशासनाने तीन दिवसांचा कालावधी लोटूनही पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था न केल्याने रुग्णांसह येथील कर्मचाºयांना त्याचा फटका बसत आहे.येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात बाह्यरुग्ण तपासणी विभागाजवळील बोअरवेलवर मोटारपंप लावून रुग्णालयाला पाणी पुरवठा केला जातो. मात्र तीन दिवसांपूर्वी मोटारपंप जळाला त्यामुळे पाणी पुरवठा बंद आहे. याच मोटारपंपाचे पाणी टाकीत साठवून त्याचा उपयोग प्रयोगशाळा, पोषाहार पुनर्वसन कक्ष, बालरोग विभाग व ओपीडीमध्येसुद्धा केला जातो. मागील तीन दिवसांपासून पाणी मिळत नसल्यामुळे सदर चारही विभागातील कर्मचारी, रूग्ण व त्यांच्या नातलगांना हात धुणे व पिण्याच्या पाण्यासाठी रुग्णालयाबाहेर भटकंती करावी लागत आहे. तर शौचालयासाठी देखीेल पाणी पुरवठा केला जात नसल्याने येथे प्रसुतीसाठी येणाºया महिला आणि रुग्णांचे हाल होत आहेत. पोषाहार पुनर्वसन केंद्रात नर्सिंग कॉलेजमधून पिण्यासाठी पाणी आणूण काम चालवावे लागत आहे. रूग्णालयात पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाण्याचा पुरवठा होतो.त्या पाण्याचा उपयोग रूग्णालयातील रूग्णांसाठी भोजन बनविणे व उर्वरित वार्डात पिण्यासाठी केला जातो. इतर विभागांपर्यंत पाणी पोहोचविण्यात आले तर पाण्याची मोठीच कमतरता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मोटारपंप दुरूस्तीची जबाबदारी कुणाचीमागील तीन दिवसांपासून मोटारपंप बंद असून त्याची त्वरीत दुरूस्ती करणे रुग्णालय प्रशासनाकडून अपेक्षीत होते. मात्र त्यांनी अद्यापही याची दखल घेतलेली नाही. बाई गंगाबाई महिला रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांचे स्थानांतरण झाले आहे. पण, सदर अधिकाºयांने आतापर्यंत पदभार सोडला नाही. सदर अधिकारी सध्या रजेवर आहेत. त्यामुळे पाण्याची समस्या कशी सुटणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पोषाहार पुनर्वसन केंद्रात पाणी नसल्यामुळे मी स्वत: पुढाकार घेऊन बांधकाम विभागाकडे निवेदन दिले. परंतु आता काही कर्मचारी पाठवून दुरूस्तीसाठी मोटारशी जोडलेला काही भाग घेवून गेले आहेत. परंतु पाण्याची समस्या कधी दूर होईल, हे सांगता येत नाही. सध्या पिण्यासाठीच नव्हे तर हात धुण्यासाठीसुद्धा पाणी उपलब्ध नाही.-डॉ.के.के.त्रिपाठीप्रभारी अधिकारी, पोषाहार पुनर्वसन केंद्र, बीजीडब्ल्यू रूग्णालय, गोंदिया