शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

रेल्वे स्टेशनकडे जाणार्‍या ररस्त्याचे तीन-तेरा

By admin | Updated: June 6, 2014 00:04 IST

येथील सिव्हील लाईंनवासीयांना रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी सोयीस्कर ठरणार्‍या रस्त्याचे तीन-तेरा वाजले आहे. सिव्हील लाईंस परिसरातील नागरिकांचे या रस्त्यानेच रेल्वे स्थानकाकडे जाणे-येणे सुरू असते.

गोंदिया : येथील सिव्हील लाईंनवासीयांना रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी सोयीस्कर ठरणार्‍या रस्त्याचे तीन-तेरा वाजले आहे. सिव्हील लाईंस परिसरातील नागरिकांचे या रस्त्यानेच रेल्वे स्थानकाकडे जाणे-येणे सुरू असते. मात्र आजघडीला हा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडल्याने येथून ये-जा करणे आज कठीण झाले आहे. करिता या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी सिव्हील लाईंनवासी क रीत आहेत. सिव्हील लाईंन परिसरात शहराच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या विवेकानंद कॉलोनी पासून ते अन्य भागातूून सुद्धा बहुतांश नागरिकांना रेल्वे स्थानकाकडे जावयाचे असल्यास त्यांना रेल्वे क्वार्टर परिसरातून टेलीफोन एक्सचेंज समोरचा रस्ता उपयुक्त ठरतो. याच मार्गावर टेलीफोन एक्सचेंज व पोस्ट ऑफीस, बाई गंगाबाई रूग्णालय असल्याने व पुढे जाऊन बाजार तसेच रेल्वे स्थानक येत असल्याने या मार्गावर दिवसरात्र वर्दळ असते. रेल्वे स्थानकावरून सिव्हील लाईंस मध्ये जायचे म्हटल्यास रिक्षा व ऑटोवाले थेट याच मार्गाने होत प्रवाशांना घेऊन जातात. यामुळे सिव्हील लाईंसवासीयांसाठी हा रस्ता महत्वाचा आहे. आजघडीला मात्र या रस्त्याची पार दुर्गत झाली आहे. हा रस्ता ठिकठिकाणी उखडून गेला आहे. यामुळे रस्त्यावर मोठाले खड्डे पडले असून यातून मार्ग काढत ये-जा करणे त्रास दायक झाले आहे. आज या रस्त्याने आवागमन केले असता दचके बसत असून चिमुकले वृद्धांना येथून घेऊन जाणे धोकादायक झाले आहे. असे असतानाही स्थानिक जनप्रतिनिधी किंवा नगरसेवकांचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. सध्या शहरात रस्ता दुरूस्तीची कामे वेगाने होत आहेत. हि चांगली बाब आहे, मात्र यासोबतच महत्वाच्या रस्त्यांची दुरूस्ती होणे अतिशय गरजेचे आहे. करीता सिव्हील लाईंसवासीयांसाठी महत्वपूर्ण असलेल्या या रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी सिव्हील लाईंस मधील नागरिक करीत आहेत.  (शहर प्रतिनिधी)