ऑपरेशन ऑल आऊटमध्ये पकडले तीन तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:31 AM2021-07-30T04:31:39+5:302021-07-30T04:31:39+5:30

गोंदिया : पोलिसांच्या अभिलेखावर गुन्हेगारांवर करडी नजर ठेवीत त्यांच्या कृत्यांना पायबंद घालण्यासाठी गोंदिया शहर पोलिसांनी २८ जुलैच्या रात्री ११ ...

Three Tadipars caught in Operation All Out | ऑपरेशन ऑल आऊटमध्ये पकडले तीन तडीपार

ऑपरेशन ऑल आऊटमध्ये पकडले तीन तडीपार

Next

गोंदिया : पोलिसांच्या अभिलेखावर गुन्हेगारांवर करडी नजर ठेवीत त्यांच्या कृत्यांना पायबंद घालण्यासाठी गोंदिया शहर पोलिसांनी २८ जुलैच्या रात्री ११ ते २९ जुलैच्या पहाटे ५ वाजेपर्यंत ऑपरेशन ऑल आऊट मोहीम राबविली. या मोहिमेत गोंदिया शहरात तीन तडीपार आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले.

गोंदिया जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले आरोपी स्वामी लीलाधर बाहे (वय ३१, रा. छोटा गोंदिया), शंकर ऊर्फ गुरू राजाराम पटले (२७, रा. संजयनगर) व सूरज अर्जुन सागर (२१, रा. सावराटोली) या तिघांना अटक करण्यात आली. त्या तिघांवर महाराष्ट्र पाेलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात ऑपरेशन ऑल आऊट राबविण्यात आले. जिल्ह्यात मालमत्तेच्या गुन्ह्यांना प्रतिबंध लागावा यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट राबविण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग गोंदिया, तिरोडा, आमगाव व देवरी यांच्यासह, सर्व ठाणेदार व संबंधीत ठाण्याचे दुय्यम पोलीस अधिकारी असे एकूण ३९ अधिकारी व ३१२ पोलीस कर्मचाऱ्यांनी ऑपरेशन ऑलआऊट राबविले. ९ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. नाकाबंदीदरम्यान २३२ वाहनांची तपासणी करण्यात आली. ३ वाहनांवर मोटार वाहन कायदाअन्वये कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील १९ हॉटेल्स, लॉज चेक करण्यात आले. संशयित इसमांबाबत तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील गुन्हे अभिलेखावरील ८६ गुन्हेगारांना त्यांच्या संशयित हालचालीसंदर्भात चेक करण्यात आले. फरार आरोपी १० व पाहिजे असलेले आरोपी १० अशा एकूण २० आरोपींना कायदेशीर कारवाई करण्यासाठी तपासले. ऑपरेशन ऑल आऊटदरम्यान जिल्ह्याचे गुन्हे अभिलेखावरील १६ निगरांनी बदमाशांना चेक केले. ३५ जेल रिलीज गुन्हेगारांना चेक केले. ही कारवाई शहरचे ठाणेदार महेश बनसोडे, सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, रामभाऊ व्होंडे, महादेव सीद, संतोष सपाटे, सहायक फौजदार घन:श्याम थेर, डीबी पथक जागेश्वर उईके, सुबोध बिसेन, अनिल कोरे, अरविंद चौधरी, प्रोद चव्हाण, योगेश बिसेन, ओमेश्वर मेश्राम, महिला पोलीस शिपाई पंधरे, बरेजू यांनी केली.

.................

पाच जणांना बजाविले समन्स

विविध गुन्ह्यांतील एकूण १६ हद्दपार इसमांना त्यांच्या घरी कायदेशीर कारवाई करीत चेक करण्यात आले असता, गोंदिया शहर ठाण्याच्या हद्दीत ३ हद्दपार आरोपी घरीच मिळाले. त्यांच्याविरुध्द कलम १४२ अन्वये कारवाई करण्यात आली. २ संशयित इसमांवर मुंबई पोलीस कायदा कलम १२२ अन्वये कारवाई करण्यात आली. यात दारुबंदीची चार प्रकरणे उघडकीस आली. ५ जणांना समन्स बजावले आहे.

Web Title: Three Tadipars caught in Operation All Out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.