शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

दारू तस्करी करणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:10 IST

गोंदिया-बल्लारशा गाडीतून दारूबंदी असलेल्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी करणाºया तिघांना रेल्वे सुरक्षा बलच्या टास्क टीमने पकडले. शुक्रवारी (दि.१५) उपनिरीक्षक विवेक मेश्राम, मुख्य आरक्षक पी. दलाई, आर.रायकवार, आरक्षक पी.एल. पटेल यांनी ही कामगिरी केली.

ठळक मुद्देरेल्वे टास्क टीमची कारवाई : गोंदिया-बल्लारशा गाडीत पकडले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया-बल्लारशा गाडीतून दारूबंदी असलेल्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी करणाºया तिघांना रेल्वे सुरक्षा बलच्या टास्क टीमने पकडले. शुक्रवारी (दि.१५) उपनिरीक्षक विवेक मेश्राम, मुख्य आरक्षक पी. दलाई, आर.रायकवार, आरक्षक पी.एल. पटेल यांनी ही कामगिरी केली.गोंदिया-बल्लारशा डेमो (गाडी क्र. ७८८२०) गाडीत वेषभूषा बदलून टास्क टीम नजर ठेवून होती. दुपारी १ ते २ वाजता वडसा-नागभीड दरम्यान तीन इसमांवर संशय आल्याने टीमने त्यांची तपासणी केली. यात त्यांनी घातलेल्या जॅकेटमध्ये दारूच्या २१४ बॉटल मिळून आल्या. गडचिरोली- चंद्रपूर येथे तिघे दारू घेऊन जात होते. पकडलेल्या दारूची किंमत १० हजार ७०० रूपये आहे. पोलिसांनी महाराष्टÑ दारू बंदी कायद्याचे कलम ६५ (ई), ८३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील परवेजखान मुस्तकीमखान (२७), चंद्रपूर जिल्ह्यातील मोहला ठाण्यांतर्गत गांधी चौकातील राहुल एकनाथ कुमरे (३०) व ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यांतर्गत पारड येथील जयदेव मुकरू दोनाडकर (४५) यांचा समावेश आहे. नफा मिळविण्याच्या दुष्टीने दारूची तस्करी करीत असल्याची कबुली या आरोपींनी दिली आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी